नेवासा : नेवासा पोलिस ठाण्यांतर्गत गुन्ह्याची उकल करण्यासाठी तपासी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशिक्षणार्थी पोलिस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी पोलिस ठाण्याची काही कालावधीकरिता सूत्रे हाती घेतली असून, तपासी पथकाला (डीबी) अंग झटकून कामगिरी दाखवावी लागणार आहे.
सुरूवातीला काही दिवस गुन्ह्यांच्या तपासासाठी या पथकाने जोरदार हालचालीही केल्या. परंतु नव्याचे नऊ दिवस संपल्यानंतर या तपासी पथकाला मरगळ आल्याचे दिसत आहे. गुन्ह्यांची उकल करण्यासाठी पाहिजे तशी गती मिळत नसल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत.

अवैध धंद्यांना आळा बसण्यासाठी हवे तेवढे प्रयत्न या पथकाकडून होतांना दिसत नसल्याने ठोस कारवाई नसल्याचे नागरिक सांगतात. नेवासा पोलिस ठाण्यातील गुन्ह्यांचा तपास जलदगतीने लागावा व अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन होण्यासाठी तपासी पथकाची (डीबी) नियुक्ती पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांनी केलेली आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.