नेवासा – रात्रीचे वेळी चोरीच्या मोटार सायकलवर संशयास्पदरित्या फिरणारे दोन तरुण यांना शिताफीने पकडुन नेवासा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे. स.पो.नि. कल्पना चव्हाण, चापोना संदिप बर्डे, पोकॉ सलमान शेख हे पोस्टे हददीत रात्रगस्त करत असताना दिनांक रात्रौ ०२/०० वा चे नेवासा सुमारास नेवासा शहरातुन फाटयाकडे जात असताना नेवासा कोर्टाजवळ एका मोटार सायकलवर दोन इसम संशयास्पद नेवासा फाटयाकडे जात असताना दिसले त्यांचा पाठलाग करुन त्यांना त्यांचे नाव गाव पत्ता विचारला असता गाडी चालविणा-या इसमाने त्याचे नाव अर्जुन गणेश घुंगासे वय २० वर्षे सध्या रा नाईकवाडी मोहल्ला नेवासा खुर्द ता नेवासा मुळ रा. औरगपुरा, भाजी मंडई जि. छत्रपती संभाजीनगर असल्याचे सांगितले त्याच्या सोबत आणखी एक इसम होता

त्यांचे ताब्यात मिळुन आलेल्या मोटार सायकलचा नंबर एम एच २० डी के २४४१ असा होता सदर इसमांना रात्री फिरणेबाबत तसेच त्यांचे ताब्यातील मोटार सायकलच्या मालकी हक्काबाबत विचारपुस करता त्यांनी काहीएक समाधानकारक उत्तर दिले नाही. काही वेळातच तपास पथकातील नारायण डमाळे, सुमित करंजकर, अवि वैदय, भारत बोडखे हे घटने ठिकाणी पोहचले. सदर इसमांना व त्यांचेकडील मोटार सायकल ताब्यात घेवुन नेवासा पोलीस स्टेशनला आणले व इसम नं १ यास विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्यांने सांगितले की, सदर मोटार सायकल ही संभाजीनगर येथील माझा मित्र सागर पुर्ण नाव पत्ता माहित नाही यांचेकडुन मी आणली आहे. सदर मोटार सायकलच्या नंबर वरुन मुळ मालकांशी पोलीसांनी संपर्क केला असता त्यांनी सांगीतले की, सदर मोटार सायकल नंबर एम एच २० डी के २४४१ ही माझे नावावर असुन ती ३ महिन्यापुर्वी वाळुंज परिसरातुन चोरीस गेली होती सदर बाबत मी वाळुंज पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा नोंद केला आहे.

सदर दोन इसम पोस्टे हददीत मोटार सायकलवर संशयास्पदरित्या फिरताना मिळुन आल्याने त्यांचेवर नेवासा पोलीस स्टेशनला गुन्हा रजि नं ४२/२०२५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १२२, १२४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हयांचा व चोरीच्या मोटार सायकल बाबत पुढील अधिकचा तपास पोहेकॉ अजय साठे हे करित आहेत. सदरची कामगिरी ही मा पोलीस अधीक्षक, श्री राकेश ओला साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक, वैभव कलुबर्मे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्री सुनिल पाटील साहेब यांचे मार्गदर्शनाखाली नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री धनजंय अ. जाधव, मसपोनि कल्पना चव्हाण, चापोकॉ संदिप बर्डे, पोकॉ सलमान शेख, पोकॉ सुमित करंजकर, पोकॉ अवि वैदय, पोकॉ नारायण डमाळे, पोकॉ भारत बोडखे यांनी केलेली आहे. सदर गुन्हांचा पुढील अधिकचा तपास पोहेकॉ अजय साठे हे करीत आहेत.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.