नेवासा – ३ तास शस्त्रक्रिया करून गायीच्या पोटातून ६० किलो प्लॅस्टिक कचरा बाहेर काढण्याची शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून, गायीची प्रकृती सुधारली आहे.
याबाबतची माहिती अशी, शहरातील निशांत साबरे यांची गाय पोट फुगल्यामुळे अत्यवस्थ झाली होती. स्थानिक पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल गायकवाड यांनी प्राथमिक तपासणीनंतर गायीवर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आणि सुमारे ३ तास सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी गायीवर यशस्वी शस्त्रक्रिया करून गायीच्या पोटातून सुमारे ६० किलो प्लॅस्टिकचा कचरा बाहेर काढला. यात प्लॅस्टिकचे कुरकुरे पॅकेट रॅपर, पतंगाचा मांजा, लोखंडी तार यांचा समावेश होता.

गायीच्या खाण्यात प्लॅस्टिक वगैरे आल्यानंतर तिचे पोट फुगले होते व तिने चारा खाणे बंद केले होते. त्यामुळे ती अत्यवस्थ झाली होती. तपासणी दरम्यान डॉक्टरांना गायीच्या पचनसंस्थेत प्लॅस्टिक अडकल्याचा संशय आला. त्यांनी गायीचे गोठ्यातच रोमॅनो टॉमी प्रकारची शस्त्रक्रिया केली. यावेळी ७ ते ८ सलाईन गायीला देण्यात आली.
शस्त्रक्रियेनंतर गायीच्या पोटात कुट्टी करून लगदा चारा घालण्यात आला. कारण गायीच्या पोटात काहीही नव्हते. २ दिवस गायीची प्रकृती पाहण्यासाठी डॉक्टर भेट देत होते. गायीची प्रकृती आता स्थिर असून, तिने चारा खाण्यास सुरुवात केली आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.