नेवासा : महायुती सरकारच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेंतर्गत गेल्या पाच महिन्यांत राज्यात मोफत २४ लाख ८८ हजार ४७ एलपीजी सिलिंडर उपलब्ध करून देण्यात आले असून त्याचा खर्च सरकारने उचलल्यामुळे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या आकडेवारीतून ही माहिती उघड झाली आहे. केंद्र सरकारच्या ‘उज्ज्वला योजने’च्या धर्तीवर राज्यात तत्कालीन महायुती सरकारच्या २०२४-२५ च्या अतिरिक्त अर्थसंकल्पात मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजने’ अंतर्गत दरमहा १ हजार ५०० रुपयांची आर्थिक मदत घेणाऱ्या महिलांसाठी ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने’ अंतर्गत तीन गॅस सिलिंडर मोफत देण्याची घोषणा केली गेली होती. ३० जुलै रोजी त्याचे परिपत्रकही निघाले होते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिलांच्या नावावर कनेक्शन असणे बंधनकारक याच योजनेतून राज्यात गेल्या महिन्यात २४ लाख ८८ हजार ४७ एलपीजी सिलिंडरचे वाटप केले गेले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.