सोनई – राज्यातील सहकारी साखर कारखान्यांसाठी कार्यकारी संचालकांचे पॅनल राज्य शासन निर्धारित करत असून राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना या पॅनलमध्ये असलेल्या अधिकाऱ्यांमधूनच कार्यकारी संचालक निवड करावी लागते. राज्य शासनाचे दि. १८/०४/२०२२ चे शासन निर्णयानुसार ५० व्यक्तींची नेमणूक करणेसाठी साखर आयुक्त कार्यालय पुणे यांचे वतीने परीक्षा घेण्यात आली. सदर परीक्षा ही पूर्व, लेखी व मुलाखत अशा तीन टप्प्यात झाली. शासनाचे वतीने घेण्यात आलेल्या या कार्यकारी संचालक पॅनल परीक्षेचे निकाल जाहीर झालेले असून या परीक्षेत लांडेवाडी गावचे सुपुत्र हेमंत शरदराव दरंदले यांनी यश संपादन केले व राज्यात ५ वा गुणानुक्रम प्राप्त केला आहे.

ते वित्तीय व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदवीधारक असून सध्या ते मुळा सहकारी साखर कारखाना येथे चिफ अकौंटंट म्हणून कार्यरत आहेत. अतिशय कष्टातुन व सातत्यपूर्ण अभ्यासाने हे यश मिळवले आहे.त्यांच्या या यशाबद्दलमा.मंत्री शंकरराव गडाख, मा.सभापती सौ सुनीताताई गडाख यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.तसेच मुळा कारखाना सोनई यांच्या वतीने चेअरमन नानासाहेब तुवर,जनरल मॅनेजर शंकरराव दरंदले,डी एम निमसे,विजय फाटके, लक्ष्मण बारगळ यांनी त्यांचा सत्कार केला आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.