गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील सोनई येथील किड्स किंग्डम अकॅडमी सी.बी.एस.सी परीक्षा केंद्र नेवासा तालुका, येथे कॉपीमुक्त परीक्षा व त्या संदर्भात पर्यवेक्षक शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले. येत्या १५ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या केंद्रीय माध्यमिक शिक्षक मंडळ नवी दिल्ली द्वारे घेण्यात येणाऱ्या २०२५ च्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचे नियोजन नेवासा तालुक्यामध्ये किड्स किंग्डम अकॅडमी सोनई येथे करण्यात आले आहे.या ठिकाणी एकुण ३२० विद्यार्थी आपला परिक्षेचा हक्क बजावणार आहेत. परीक्षा केंद्र अधीक्षक म्हणून मंगेश जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर केंद्र अधीक्षकांनी परीक्षेसाठी आवश्यक गोष्टींची तपासणी केली.

सी.बी.एस.सी ने ठरवून दिलेल्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन योग्य प्रकारे असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले तसेच किड्स किंग्डम अकॅडमी चे कौतुक देखील या वेळी केले.यावेळी ज्ञानेश्वर इंटरनॅशनल स्कूल भानस हिवरे, त्रिमूर्ती पब्लिक स्कूल नेवासा फाटा, मौर्य अकॅडमी राहुरी, यश अकॅडमी सोनई व किड्स किंग्डम अकॅडमी सोनई येथील पर्यवेक्षक शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित मार्गदर्शक केंद्र अध्यक्ष व इतर संबंधित शिक्षकांचे स्वागत नानासाहेब हापसे यांनी केले तर उपप्राचार्य हनुमंत फटाले यांनी आभार मानले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.