शिरेगावचे सरपंच युवानेते किरण जाधव यांची जलसंपदामंत्री नाम.राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे तक्रार
सोनई – संदिप दरंदले | मुळा पाटबंधारे विभाग यांनी डी.वाय क्रमांक तीनच्या चारीची गेल्या पाच ते सहा वर्षा पासुन कुठल्याही प्रकारची दुरुस्ती केली नसल्याने चारी मध्ये प्रचंड प्रमाणात वेड्या बाभळी उगवल्या आहेत.यामुळे गेल्या पाच वर्षा पासुन टेल भागात पाणी आले नसल्याने लाभधारक शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान होत आहे. याबाबत भागातील लाभधारकांनी नेवासा येथे जलसंपदा मंत्री नाम. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कडे निवेदन दिले आहे.

सदर चारीची गेल्या पाच सहा वर्षा पासुन दुरुस्ती झाली नसल्याने टेलच्या भागात पाणी येत नसल्याने हजारो एकर शेतीचे मोठे नुकसान होत आहे.यामुळे उन्हाळात शेती पडीक पडत आहे.यामुळे शेतकरी वर्गाचे प्रचंड नुकसान होते. मुळा पाटबंधारे विभाग सदर चारीची दुरुस्ती का करत नाही. मुळा पाटबंधारे विभाग दरवर्षी दुरुस्तीचे कामे काढतो मग या चारीचे काम का होत नाहीत. सदर दुरुस्तीचा निधी कुठे जातो? काही ठिकाणी काम करायचे आणि काही ठिकाणी सोडून दयाचे असे प्रकार मुळा पाटबंधारे का करत आहेत. याबाबत जलसंपदा मंत्री यांनी लक्ष देणे गरजेचे असल्याचे अनेक लाभधारक शेतकरी चर्चा करत आहेत.तसेच मुळा पाटबंधारे राहुरी शाखा क्रमांक एक अंतर्गत मांजरी बंधारा वरील खराब झालेल्या फळया निडल्स मिळाव्यात याबाबत पण जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे निवेदनातून लक्ष वेधले आहे.

गेल्या पाच सहा वर्षा पासुन पाऊस मोठया प्रमाणात होत असून यामुळे सदर मांजरी बंधारा वरील फळया निडल्स या खराब जिर्ण झाल्यामुळे मोठया प्रमाणात पाणी गळती होते.यामुळे शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान होते याबाबत या विभागाला कायम सांगून सुद्धा निडल्स मिळत नाही ही पानेगाव,मांजरी, शिरेगाव भागातील लाभधारक शेतकरी वर्गाची सदर मागणी आहे. याबाबत शिरेगाव येथील सरपंच युवानेते किरण जाधव यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांना निवेदन देऊन लक्ष वेधले आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.