नेवासा – नेवासा येथील ज्ञानोदय इंग्लिश स्कूलमधील दहावीच्या विद्यार्थ्यांचा परीक्षेसाठी शुभचिंतन व निरोप समारंभ शनिवार दिनांक १५ फेब्रुवारी २०२५ रोजी विद्यालयाच्या राजर्षी शाहू सभागृहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य रावसाहेब चौधरी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून दा. ह. घाडगे पाटील विद्यालयाचे प्राचार्य सोपानराव काळे, सुंदरबाई गांधी कन्या विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सुनीता दिघे, ज्ञानोदयचे पर्यवेक्षक बाळासाहेब पवार हे उपस्थित होते.
क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक संजय आखाडे यांनी केले. विद्यार्थ्यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे व विद्यालयातील सर्व अध्यापकांचा सन्मान करण्यात आला. आपल्या आयुष्यात आपले आई, वडील व शिक्षक या तीन व्यक्तींशी आयुष्यभर प्रामाणिक रहा, असा मौलिक सल्ला प्राचार्य सोपानराव काळे यांनी दिला. प्रश्नांचे स्वरूप विचारात घेऊन नेमकेपणाने उत्तरे लिहिली तर अधिक चांगले गुण मिळवता येतात, असे विचार पर्यवेक्षक बाळासाहेब पवार यांनी व्यक्त केले. बदलत्या परीक्षा पद्धतीला सामोरे जाताना जिद्द, चिकाटी आणि परिश्रमांची नितांत आवश्यकता आहे असे मत पर्यवेक्षिका सुनीता दिघे यांनी व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य रावसाहेब चौधरी यांनी जुन्या आणि नवीन परीक्षा पद्धतीतील बदललेल्या स्वरूपाचे सविस्तर विवेचन केले तसेच यावर्षीची कॉपीमुक्त परीक्षा यशस्वी करण्याचे आवाहन केले.

यावेळी शिक्षक सुनील धस यांनी सादर केलेल्या परीक्षेवरील कवितेने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी चि. युवराज शेळके याने केले तर आभार शिक्षक संजय आखाडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक संजय मतकर, काकासाहेब काळे, अनिल भणगे, श्रीमती गाढे, संदीप ढेरे आदींनी परिश्रम घेतले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.