ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Nilesh Lanke

Nilesh Lanke : लोकसभा निवडणुकीत अहमदनगरमध्ये सुजय विखे पाटील यांचा पराभव करून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेवार निलेश लंके(Nilesh lanke) हे जायंट किलर ठरले. निकालानंतर आता दोन दिवसांनी अहमदनगरमध्ये मोठा राडा झाला आहे.

Nilesh Lanke : लोकसभा निवडणुकीत अहमदनगरमध्ये सुजय विखे पाटील यांचा पराभव करून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेवार निलेश लंके हे जायंट किलर ठरले. निकालानंतर आता दोन दिवसांनी अहमदनगरमध्ये मोठा राडा झाला आहे. यात निलेश लंके यांच्या जवळच्या माणसावर सुजय विखे पाटील समर्थकांकडून प्राणघातक हल्ला झालाय.

खासदार निलेश लंके यांचा सहकारी राहुल झावरे याच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची माहिती समोर आलीय. यामुळे खळबळ उडालीय. राहुल झावरे यांना रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर  उपचार केले जात आहेत.

सुजय विखे पाटील आणि निलेश लंके समर्थकांमध्ये आधी झालेल्या वादानंतर हा हल्ला झाला आहे. राहुल झावरे हे निलेश लंके यांचे जवळचे सहकारी असून त्यांना गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केलं आहे. झावरे यांची गाडी फोडण्यात आली आहे.

पारनेर तालुक्यातल्या गोरेगावमध्ये खासदार लंके समर्थकांनी माजी खासदार सुजय विखे पाटील समर्थकांना मारहाणीची माहिती समोर आली होती. त्यानंतर पारनेर बसस्थानकावर लंके समर्थकांवर हल्ला करण्यात आला असं समजते.

अहमदनगर नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके हे 28 हजार 929 मतांनी निवडून आले आहेत. त्यांनी भाजपाचे उमेदवार माजी खासदार सुजय विखे यांचा पराभव केला.

Nilesh Lanke

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Nilesh Lanke
Nilesh Lanke

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Nilesh Lanke
error: Content is protected !!