ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

दिंडी

नेवासा – तालुक्यातील नजीक चिंचोली येथील जगदंबा खडेश्वरी देवस्थानच्या वतीने आयोजित श्री जगदंबा खडेश्वरी देवस्थान ते पंढरपूर आषाढी वारी पायी दिंडीचे गुरुवार दि.४ जुलै रोजी प्रस्थान होणार असून या दिंडी सोहळयाची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती देवस्थानचे प्रमुख महंत श्री गणेशानंदजी महाराज यांनी दिली. श्री. ह.भ.प. प.पु.गुरुवर्य महंत गणेशानंदजी महाराज (श्री जगदंबा खडेश्वरी देवस्थान न. चिंचोली) यांच्या मार्गदर्शनाखाली जगदंबेची पालखी आषाढी वारीसाठी निघणार आहे.पालखीचे प्रस्थान श्री. जगदंबा मंदिरामधुन ज्येष्ठ वद्य १३ गुरूवार दि.४ जुलै रोजी  निघून श्री क्षेत्र पंढरपुर येथे सोमवार दि. १५ जुलै रोजी प्रवेश करणार आहे.

दिंडी


    महंत गणेशानंदजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या या दिंडीचे यदां हे २१ वे वर्ष असून या दिडीं सोहळ्याचा पंढरपुरपर्यंत बारा दिवसाचा प्रवास असणार आहे.टाळ – मृदंग व हरीनामाचा गजर करत वारकरी देहभान विसरुन विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने आनदांने पायी चालत असतात. दिडीं सोहळ्यामध्ये दररोज पहाटे काकडा भजन ,दुपारी प्रवचन, सांयकाळी हरीपाठ, व महाआरती, व राञी ८ ते १० यावेळेत किर्तन असे दैनंदिन कार्यक्रम होणार आहे. दिडींतील वारकर्‍यानां दररोज चहा,नाष्टा तसेच दुपारी व राञी अन्नदान व्यवस्था दानशुर भाविकांनी केलेली आहे..

देडगाव, हनुमान टाकळी,चेकेवाडी,खिळद,आष्टी,निबोंर्डी,जातेगाव,कुंभेज,दहिवली,परीते,टाकळी,असे मुक्काम करत दिडीं सोमवार दि.१५ रोजी पंढरपुर येथे पोहचणार आहे.गुरुपौर्णीमेला प.पु.महंत गुरुवर्य गणेशानंदजी महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने सोहळ्याची सागंता होणार आहे.तरी पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी या सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन श्री खडेश्वरी संस्थानचे मठाधिपती प.पु.गुरुवर्य महंत गणेशानदंजी महाराज व दिंडी सोहळा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

newasa news online
दिंडी
दिंडी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

दिंडी
दिंडी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

दिंडी
error: Content is protected !!