ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Sankashti Chaturthi 2024

Sankashti Chaturthi 2024 : आज संकष्टी चतुर्थी. हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी गणपतीची विधिवत पूजा केली जाते. असे केल्याने शुभ फळ मिळते असे मानले जाते.

Sankashti Chaturthi 2024 : आज संकष्टी चतुर्थी(Sankashti Chaturthi) असून वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी आहे. या तिथीला एकदंत संकष्ट चतुर्थी साजरी केली जाते. पंचागानुसार, यंदा एकदंत संकष्टी चतुर्थी 26 मे रोजी, म्हणजेच आज साजरी केली जात आहे. हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला खूप महत्त्व आहे. हा खास दिवस गणपती बाप्पाला समर्पित आहे. 

या दिवशी विधीनुसार गणपती बाप्पाची पूजा करून उपवास केला जातो. धार्मिक श्रद्धेनुसार असं केल्याने विघ्नहर्ता आपल्या भक्तांचे सर्व संकट दूर करून त्यांना सुख-समृद्धीचा आशीर्वाद देतो. संकष्टी चतुर्थीचा (Sankashti Chaturthi) शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि चंद्रोदयाची वेळ जाणून घेऊया.

संकष्टी चतुर्थीचा शुभ मुहूर्त

जर तुम्ही एकदंत संकष्टी चतुर्थीचा उपवास करत असाल तर पूजेच्या वेळेची विशेष काळजी घ्यावी. तुम्ही सूर्योदयानंतर गणेशाची आराधना करू शकता. सकाळी 5: 25 ते 10:36 पर्यंत सर्वार्थ सिद्धी योग असेल, यासोबतच या दिवशी साध्य योग देखील जुळून आला आहे.

या शुभ योगांच्या काळात पूजा केल्याने इच्छित परिणाम प्राप्त होण्यास आणि कार्यात यश प्राप्त करण्यास मदत होते, अशी मान्यता आहे. तसेच, तुम्ही या काळात तुम्ही जे काही कार्य कराल ते यशस्वी ठरतं.

चंद्रोदयाची वेळ

संकष्टी चतुर्थीच्या व्रताच्या दिवशी चंद्राला अर्घ्य देण्याची परंपरा आहे आणि यानंतरच तुम्ही उपवास सोडू शकता. 26 मे रोजी रात्री 09:41 वाजता चंद्रोदय होईल, यानंतर तुम्ही तुमचा उपवास सोडू शकता.

संकष्टी चतुर्थीचे महत्त्व

संकष्टी चतुर्थीला खूप धार्मिक महत्त्व आहे. हा खास दिवस गणपतीला समर्पित आहे. या दिवशी विधीनुसार गणपतीची पूजा केली जाते आणि उपवास केला जातो. उपवासाच्या काळात लोक बाप्पाचे आशीर्वाद घेण्यासाठी गणेश मंदिरात जातात. श्रीगणेश हा सर्व देवतांमध्ये सर्वात प्रिय आहे. असे मानले जाते की त्यांची पूजा केल्याने जीवनातील सर्व दुःख दूर होतात आणि धन, समृद्धी आणि सुख वाढते.

पूजा विधी

सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला.
घरातील मंदिराची स्वच्छता करून गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करावी.
गणपतीसमोर तुपाचा दिवा लावावा.
त्यांना फळे, फुले, अगरबत्ती आणि नैवेद्य अर्पण करा.
गणपतीला मोदक, लाडू किंवा खीर अर्पण करा.
आता त्यांची विधिवत पूजा करा आणि नंतर आरती करा.
यानंतर श्रीगणेशाच्या मंत्रांचा जप करा.
संकष्टी चतुर्थीची व्रत कथा ऐका.
संध्याकाळच्या वेळीही विधीनुसार गणेशाची पूजा करावी.
चंद्रोदयानंतर चंद्र देवाला जल अर्पण करावे.

Sankashti Chaturthi
Sankashti Chaturthi
Sankashti Chaturthi

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Sankashti Chaturthi
Sankashti Chaturthi

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Sankashti Chaturthi
error: Content is protected !!