ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

पथसंचलन

नेवासा –शिर्डी लोकसभेसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे. या अनुषंगाने नेवासा तालुक्यात मतदान प्रक्रिया निर्भय व खुल्या वातावरणात होण्याच्यादृष्टीने नेवासा शहरासह कुकाणा व नेवासा फाटा येथे शनिवारी पथसंचलन करण्यात आले.

पथसंचलन

यामध्ये नेवासा पोलीस ठाण्याचे ६ अधिकारी, ३५ कर्मचारी तसेच हिंगोली येथील राज्य राखीव पोलीस दलाचे ५५ कर्मचारी सहभागी झाले होते. नेवासा शहरातील मळगंगा देवी मंदिरापासून सुरू झालेले पथसंचलन बस स्थानक, गणपती मंदिर चौक, नगरपंचायत चौक, नायकवाडी गल्ली, शेंडे गल्ली, मारुती चौक, मोहिनीराज चौक औदुंबर चौक येथून पोलीस ठाण्यात समारोप करण्यात आला. पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, गोपनीय शाखेचे अवी वैद्य, गणेश फाटक यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते. या कार्यकाळात कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांची गय करणार नसल्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी स्पष्ट केले.

newasa news online
पथसंचलन

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

पथसंचलन
पथसंचलन

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

पथसंचलन
Share the Post:
error: Content is protected !!