ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

हाणामारी

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील सोनई येथे दोन गटात हाणामारी होऊन पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पोलीस सुत्रांकडून समजलेल्या माहिती नुसार दि. २ जुन रोजी नर्मदा विष्णु तागड वय ५५ रा. सोनई यांचे गावातील दुकानात दुपारी १ वाजता आरोपी सागर अरुण खोसे,अरुण माधव खोसे, लताबाई अरुण खोसे, सुरेखा सागर खोसे, सर्व राहणार मुळा कारखाना व इतर दोन अनोळखी इसम यांनी फिर्यादी यांचे दुकानात घुसून दुकानची तोडफोड करत मारहाण केली व शिवीगाळ करत जिवे ठार मारण्याची धमकी दिली.त्याचबरोबर सुन अर्चना हीच्या गळ्यातील सोन्याचे गंठन हिसकावून घेतले असल्याचे फिर्यादी मध्ये म्हटले आहे.

दाखल फिर्यादी वरुन वरील आरोपी विरुद्ध गुन्हा र नं. २४७/२०२४ भा. द. वि. कलम १४३,१४७,१४८,१४९,३५४,३५४(ब),३२७,३२४,४२७,५०४,५०६,प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पो. हे. काॅ. आर. लबडे हे करत आहेत. दुसरी फिर्याद लता अरुण खोसे वय ५५ रा. मुळा कारखाना सोनई यांचे राहत्या घरात दुपारी १२.३४ वाजता घुसून फिर्यादी हिस लज्जा उत्पन्न होईल असे क्रुत्य केले त्याचा जाब विचारण्यासाठी आरोपींच्या घरी गेले असता मारहाण करत जय सुरेखा सागर खोसे हीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र बळजबरीने हिसकावून घेतले व जिवे ठार मारण्याची धमकी दिली.

दाखल फिर्यादी वरुन आरोपी विष्णू तागड, नर्मदा विष्णू तागड, सुनील विष्णू तागड, जय सुनील तागड, सर्व रा. सोनई यांचे विरुद्ध गुन्हा र नं. २४८/२०२४ भा. द. वि. कलम ३२७,३५४,३५४(अ), ४५२,३२४,३२३,५०४,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पो. ना. बि. जि. बाचकर हे करत आहेत.

हाणामारी
हाणामारी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

हाणामारी
हाणामारी
हाणामारी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

हाणामारी
error: Content is protected !!