ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

यश अकॅडमी

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या उपक्रमाचे पालकांकडून कौतुक.


सोनई – मुळा एज्युकेशन सोसायटीचे यश अकॅडमी सोनई सी .बी .एस .ई स्कूलमध्ये संस्थेचे उपाध्यक्ष उदयन गडाख यांच्या संकल्पनेतुन समर स्माईल्स 2024 या समर कॅम्पला उत्साहात सुरुवात झाली. समर कॅम्पसाठी तालुक्यातील पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला . 180 विद्यार्थ्यांनी या समर कॅम्पमध्ये सहभाग घेतला . डॉ निवेदिता उदयन गडाख व नेहल प्रशांत गडाख यांच्या प्रमुख उपस्थितीत समर कॅम्पचे उद्धाटन संपन्न झाले .
पारंपरिक विद्यार्थ्यांचे स्वागत औक्षण करून व गुलाब पुष्प देऊन करण्यात आले . विद्यार्थ्यांनी पोहणे , क्रिकेट , घोडेस्वारी , नेमबाजी , नृत्य ‘ खेळ , विविध कला या उपक्रमात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला .विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण आगळा वेगळा आनंद लाभला . या सहभागी विद्यार्थ्यांसाठी चविष्ट व पोषक अल्पोपहार व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे . त्याचबरोबर अबॅकस , वैदिक गणित अशा मुलांच्या बौद्धिक कौशल्याचा विकास करणाऱ्या उपक्रमांबरोबरच विद्यार्थ्यांच्या विविध कलांना वाव देणारा शेकोटीसारखा उपक्रम राबविण्यात आला .

यश अकॅडमी

हा समर कॅम्प ६ ते ९ व १० ते १५ अशा दोन वयोगटांसाठी आयोजित केलेला आहे . तसेच निवासी व अनिवासी अशा दोन्ही सुविधा उपलब्ध करून दिले आहेत . सोनई परिसरात इतक्या भव्य प्रमाणात समर कॅम्पचे प्रथमच करण्यात आले आहे . त्यामुळे पालकांमध्ये प्रचंड उत्सुकता असून परिसरामध्ये कौतुकाचा व चर्चेचा विषय झाला आहे . समोर कॅम्प ४ मे ते ११ मे २०१४ पर्यंत सुरू राहील अशी माहिती प्राचार्य अझर गोलंदाज
यांनी दिली.


यश अकॅडमी सोनईच्या वतीने आयोजित केलेला समर कॅम्प विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देणारा आहे पुण्या, मुंबईच्या धर्तीवर उदयन गडाख यांच्या संकल्पनेतुन विद्यार्थ्यांना नवीन कौशल्य शिकण्यास मिळाले यातुन विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार मिळणार आहे. मनोज गोसावी सहभागी विद्यार्थ्यांचे पालक.

यश अकॅडमी
यश अकॅडमी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

यश अकॅडमी
यश अकॅडमी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

यश अकॅडमी
error: Content is protected !!