ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

शिक्षा
शिक्षा

घरात सारवण काम करत असलेल्या महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला तिचा पती जाब विचारण्यासाठी गेला असता आरोपीसह चौघांनी त्याला शिवीगाळ करत लोखंडी पाईपनं मारहाण करून जखमी केलं. तसंच जीवे मारण्याची धमकी दिली.

आरोपी किरण गायकवाड हा मोबाईल चार्जिंग लावण्याच्या बहाण्यानं सदर महिलेच्या घरात घुसला होता. दि. 17 जून 2012 रोजी घडलेल्या या घटने प्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी नेवासा कोर्टात चौघा आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र सादर केलं.

प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. गुंजवटे यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत आरोपी किरण भानुदास गायकवाड, भानुदास रामभाऊ गायकवाड, मिराबाई भानुदास गायकवाड आणि सुवर्णा किरण गायकवाड या चौघांना एक वर्ष कारावास आणि दंडाची शिक्षा ठोठावली.

या खटल्यात अभियोग पक्षातर्फे विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता श्रीमती एस. पी. औताडे यांनी काम पाहिलं. पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हेडकॉन्स्टेबल राजू शंकर काळे आणि ज्योती नवगिरे यांनी सहाय्य केले. नेवासा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केलं.

शिक्षा

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

शिक्षा
शिक्षा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

शिक्षा

Share the Post:
error: Content is protected !!