ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Gudi Padwa

Gudi Padwa Wishes 2024 : गुढीपाडवा(Gudi Padwa ) म्हणजे नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस असून, चला सर्वांना या खास दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊन वर्ष गोड-धोड करूया.

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा(Gudi Padwa Wishes 2024)

नवंवर्ष नवा हर्ष….
नवा जोश नवा उत्कर्ष…..
नववर्षाभिनंदन.
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

नवीन पल्लवी वृषलतांची,
नवीन आशा नववर्षाची,
चंद्रकोरही नवीन दिसते,
नवीन घडी ही आनंदाची,
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा.

सण आला सौख्याचा पण काळजी घ्या
सण आणि शुभेच्छा देण्याच्या नादात
कोरोनाची करू नका साथ
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

नववर्ष आला आता आपला फळांचा राजा पण येणार
मग तयार व्हा आणि नववर्षात ताव मारायला
नववर्षाच्या आंबामय शुभेच्छा

आली आहे बहार नाचूया गाऊया..
एकत्र येऊन आनंद साजरा करूया..
निसर्गाची किमया अनुभवूया..
एकमेंकाना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देऊया.

तुम्हाला मिळो गणपतीचा आशिर्वाद..
विद्या मिळो सरस्वतीकडून..
धन मिळो लक्ष्मीकडून..
प्रेम मिळो सगळ्यांकडून..
पूर्ण होवो प्रत्येक इच्छा..
गुढीपाडवा खूप खूप शुभेच्छा.

दिवस उगवतो दिवस मावळतो
वर्ष येतं वर्ष जातं पण
प्रेमाचे बंध कायम राहतात,
आपलं नातं असं दरवर्षी वृद्धिंगत व्हावं हीच सदिच्छा,
सर्वांना नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.

आशा-आकांक्षांचे बांधून तोरण..
समृद्धीची गुढी उभारू द्वारी.
गुढीपाडव्याच्या आणि नववर्ष पर्वाच्या हार्दीक शुभेच्छा

नक्षीदार काठाचे रेशमी वस्त्र,
तांब्याचा किंवा चांदीचा तांब्या,
कडुनिंबाची पानं, साखरेची माळ,
अशी उभारूया समृद्धीची गुढी.
नववर्षाभिनंदन.
गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा

श्रीखंडपुरीची लज्जत,
गुढी उभारण्याची लगबग,
सण आहे आनंदाचदा आणि सौख्याचा
तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा.

नवे वर्ष, नवी सुरुवात…
नव्या यशाची,
नवी रूजवात…
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

नव वर्षाची सुरूवात होवो न्यारी…
सुख-समृद्धीने सजो आपली गुढी…
हीच शुभेच्छा आहे आज माझ्या मनी

सण हर्षाचा,
नव्या संकल्पांचा,
इच्छा आकांक्षा,
स्पप्नपूर्तींना बळ देणारा.
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

गुढी पाडव्याला आहेत अनेक कथा…
गुढी म्हणजे विजयाची पताका…
चैत्र महिन्यात सजली झाडं-झुडपं…
म्हणूनच हिंदू धर्मात याला आहे नववर्ष म्हणून ओळख…
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

उभारून आनंदाची गुढी दारी,
जीवनात येवो रंगात न्यारी,
पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांशा,
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

आयुष्य व्हावे स्वप्नासारखे साकार,
हाच विचार मनात घेऊन करूया नव्या वर्षाला सुरूवात..
नववर्षाभिनंदन…
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

सोनेरी पहाट…
उंच गुढीचा थाट,
आनंदाची उधळण,
अन् सुखाची बरसात…
दिवस सोनेरी,
नव्या वर्षाची सुरुवात…
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा.

वसंताची पहाट घेऊन आली नवचैतन्याचा गोडवा,
समृद्धीची गुढी उभारु,
आला चैत्र पाडवा…
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा.

आशेची पालवी,
सुखाचा मोहोर…
समृद्धीची गुढी,
समाधानाच्या गाठी…
नववर्षाच्या शुभेच्या !

सोनेरी सूर्याची सोनरी किरणे,
सोनेरी किरणांचा सोनरी दिवस..
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा!
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.

एक नवीन आशा,
एक नवीन सुरुवात,
एक नवीन स्वप्न उलगडण्याची वाट पाहत आहे.
हा गुढीपाडवा तुम्हाला न ऐकलेले लाखो आनंद घेऊन येवो..
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

Gudi Padwa

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Gudi Padwa
Gudi Padwa

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Gudi Padwa
Share the Post:
error: Content is protected !!