ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

SDRF

प्रवरा नदीत बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी आलेल्या SDRF पथकाची बोट उलटल्याची धक्कादायक बातमी समोर येतंय. या दुर्घटनेत पथकातील तिघांचा मृत्यू झाला आहे. 

उजनी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये सहा जण बुडाल्याची घटना ताजी असतानाच आता अहमदनगर जिल्ह्यामधून एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रवरा नदीमध्ये बुडालेल्या तरुणांना शोधण्यासाठी गेलेल्या SDRF पथकाची बोट उलटली असून त्यामध्ये तीन जवानांचा मृत्यू झाला आहे व आणखी तिघे बेपत्ता असून त्यांचा शोध सुरु आहे. या घटनेमुळे अहमदनगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. अहमदनगर जिल्ह्यामधील अकोले तालुक्यातील प्रवरा नदीत दोघे तरुण बुडाले होते. त्यांना शोधण्यासाठी एसडीआरएफचे(SDRF) पथक आणि एक स्थानिक असे एकूण सहाजण बोटीतून नदीमध्ये उतरलेले होते. शोधकार्य सुरु असतानाच एसडीआरएफ(SDRF) पथकाची बोट उलटून दुर्दवी घटना घडली. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून उर्वरित तिघांचा शोध घेणे सुरु आहे.

अकोले तालुक्यातील मनोहरपूर फाटा परिसरात प्रवरा नदीवरील केटीवेअर बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेले दोन तरुण पाण्यात बुडाले होते. ही घटना बुधवारी (ता. २२) दुपारी घडली होती. सागर पोपट जेडगुले, अर्जुन बबन जेडगुले हे दोघे बुडाले होते. सागर पोपट जेडगुले व अर्जुन बबन जेडगुले याच्यासह १० ते ११ जण बुधवारी मनोहरपूर फाटा परिसरात मूरघास काढण्यासाठी गेले होते. दुपारी १.३० ते २ दरम्यान मूरघास काढून झाल्यावर उन्हाच्या तीव्रतेने दिलासा घेण्यासाठी हे सर्व जण पोहण्यासाठी प्रवरा नदीपात्रातील मनोहरपूर फाटा येथील केटीवेअर बंधाऱ्याजवळ गेले होते.

इंदापूरमध्ये उजनी जलाशयात बोट पलटी होऊन सहा जण बेपत्ता झाले होते. यामध्ये एकाच कुटुंबातील 4 जणांवर काळाने घाला घातला. पती-पत्नी आणि दोन चिमुकल्यांचा मृतांमध्ये समावेश आहे. सहा जणांपैकी 5 जणांचा मृतदेह सापडल्याची माहिती आहे. एका मृतदेहाचा शोध सुरू आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, गोकूळ दत्तात्रय जाधव (वय ३० वर्षे ), कोमल गोकूळ जाधव (वय २५ वर्षे ), शुभम गोकूळ जाधव (वय दीड वर्ष), माही गोकूळ जाधव (वय तीन वर्षे,) या संपूर्ण कुटुंबाला जलसमाधी मिळाली आहे. याशिवाय कुगाव गावातील अनुराग उर्फ गोल्या न्यानदेव अवघडे (वय 20) ह्या बोट चालकाचाही मृत्यु झाला आहे. तसंच मात्र गौरव  धनंजय डोंगरे (वय 25 वर्षे) हा बेपत्ता युवक अद्याप सापडलेला नाही. एनडीआरएफचे(SDRF) जवान या प्रकरणात शोध घेत आहेत. 

यावेळी पोहताना अर्जुन जेडगुले हा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाला. तो पाण्यात बुडू लागल्याने त्यास वाचवण्यासाठी सागर जेडगुले पुढे गेला. त्यास वाचविण्याच्या प्रयत्नात सागरही पाण्यात बुडाल्याने दोघेही गतप्राण झाले.

SDRF
SDRF

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

SDRF
SDRF

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

SDRF
error: Content is protected !!