ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

ज्ञानेश्वर

नेवासा – तालुक्यातील भानसहिवरा येथील सुलोचना बेल्हेकर शिक्षण संस्था संचालित ज्ञानेश्वर पॉलिटेक्निक (तंत्रनिकेतन) चा महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण बोडनि नुकताच निकाल जाहीर केला. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळांने विद्यार्थीची उन्हाळी २०२४ परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेतली होती. याचा उत्कृष्ट निकाल लागला. सर्व विभागातून तृतीय वर्षातील संगणक विभागातून सर्वोजित कदम (८३.६६ टक्के) याने प्रथम, प्रथम वर्षातील संगणक विभागातील प्रतीक्षा बदगले (८३.५३ टक्के) हिने द्वितीय क्रमांक, तर प्रथम वर्षातील संगणक विभागातून द्व्यिा गाडेकर (८२.९४ टक्के) हिने तृतीय क्रमांक मिळवला.

ज्ञानेश्वर

स्थापत्य विभागात तृतीय वर्षातील ज्ञानेश्वर भासर (८१.६७ टक्के), द्वितीय वर्षातील काळे ओम सुवर्णा (७५७५ टक्के), द्वितीय वर्षातील सिद्धेश गवळी (७५६७ टक्के), संगणक विभागात तृतीय वर्षातील साक्षी घुले (८१.४९ टक्के), तृतीय वर्षातील प्रज्ञा घुले (८०.८६ टक्के), आणि प्रथम वर्षातील रोहिणी हापसे(८०.५९ टक्के), इलेक्ट्रॉनिक्स विभागात तृतीय वर्षातील वैभव निकटे (७७.७५ टक्के), सिद्धार्थ जाधव (७७.१३ ठक्के) आणि तृतीय वर्षातील युवराज गटकळ (७५०० टक्के), मेकॅनिकल विभागात प्रथम वर्षातील एमडी सहानुल्ला (७७.४४ टक्के), तृतीय वर्षातील ज्ञानेश्वर पटारे (७७.२८ टक्के), द्वितीय वर्षातील महेश विखे (७४.३८ टक्के) यांनी यश मिळवले. सर्व विद्यार्थ्यांना विभागप्रमुख प्रा. वैभव दुधे,

प्रा. योगेश मानळ, प्रा. शाहरूख पठाण, प्रा. राजेंद्र घुले, प्रा. विनोद भालेकर, प्रा. गौरव लांडगे आर्दीचे मार्गदर्शन लाभल्याचे प्राचार्य एच. जे. आहिरे यांनी सांगितले. ज्ञानेश्वर पॉलिटेक्निकमधील सर्व प्राध्यापक हे अअनुभवी व उच्चशिक्षित असून त्याचा पूर्ण वेळ हा विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी उपलब्ध आहे. ज्ञानेश्वर पॉलिटेक्निकमध्ये प्रशस्त इमारती सोबतच अद्ययावत असे कॉम्पुटर सेंटर, प्रेक्टिकल, ग्रंथालय, इंटरनेट, स्वतंत्र होस्टेल, वर्कशोप अशा सुविधा देण्यात आल्या आहेत. संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश बेल्हेकर, डॉ. रंजना बेल्हेकर, अभिषेक बेल्हेकर, प्राचार्य एच. जे. आहिरे यांनी गुणवंताचे कौतूक केले.

ज्ञानेश्वर
newasa news online
ज्ञानेश्वर

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

ज्ञानेश्वर
ज्ञानेश्वर

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

ज्ञानेश्वर
error: Content is protected !!