ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

अंत्यविधी

कालच वाकडी येथील एकाच कुटुंबातील पाच जण विहिरीत पडून मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली आहे त्या पाच जणांना रात्री ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदन करण्यासाठी नेले होते, प्रशासनाने मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिले व त्यांचा एकत्रित अंत्यविधी वाकडी येथे शोकाकुल वातावरणामध्ये सकाळी नऊ वाजता करण्यात आला या घटनेने पूर्ण नेवासा तालुकाच नव्हे तर महाराष्ट्र हादरला आहे. प्रत्येकाच्या मुखामध्ये ही घटना म्हणजेच दुर्दैवी घटना असून असे बोलले जात आहे या घटनेने वाकडी परिसर तसेच नेवासा तालुक्यामध्ये मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

यामध्ये माणिक गोविंद काळे, संदीप माणिक काळे, अनिल बापूराव काळे, विशाल अनिल काळे, यांच्या मृतदेहावरती आज सकाळी नऊ वाजता वाकडी येथे त्यांच्या निवासस्थानी एकत्रित अंत्यविधी करण्यात आला. त्यातील एक जण बाबासाहेब गायकवाड हे सलाबतपूर येथील असून त्यांच्यावर अद्याप अंतिम संस्कार झाले नाहीत वाकडी येथे अंत्यविधी साठी तालुक्यातील हजारो नागरिक उपस्थित होते.

तसेच या कुटुंबीयांमधील सर्व सदस्य दुःखमय वातावरणामध्ये पाहावयास मिळत आहे. या अंत्यविधीसाठी तालुक्यातील राजकीय धार्मिक सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने वाकडी गावी उपस्थित होते या दुःखद घटनेने वाकडी नव्हे तर पूर्ण नेवासा तालुका तसेच महाराष्ट्र भर हळहळ व्यक्त केली जात आहे. या दुःखद घटना प्रसंगी नेवासा तालुक्याचे आमदार शंकरराव गडाख, खासदार सदाशिव लोखंडे, माजी आमदार पांडुरंग अभंग, विठ्ठलराव लंघे आदी राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी सर्व मृत पावलेल्या सदस्यांच्या कुटुंबीयांस सांत्वन भेट दिली.

newasa news online
अंत्यविधी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

अंत्यविधी
अंत्यविधी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

अंत्यविधी
error: Content is protected !!