ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

छत्रपती शिवाजी किंगज्

नेवासा – भव्य डे- नाईट क्रिकेट स्पर्धेत ज्ञान फाऊंडेशन व पसायदान स्पोर्टस् क्लब आयोजित ज्ञान प्रीमियर लीग – २०२४ च्या शेवटच्या क्रिकेट सामन्यात छत्रपती शिवाजी किंगज् हा संघ विजेता ठरला आणि जनता गॅरेज हा संघ उपविजेता ठरला. नाणेफेक जिंकून छत्रपती शिवाजी किंगज् या संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेऊन ६ षटकात २ बाद ८३ धावांचे आव्हान जनता गॅरेज च्या संघासमोर ठेवले. या भावांचा पाठलाग करताना जनता गॅरेज संघाने ६ बाद ५३ धावाच केल्या आणि छत्रपती शिवाजी किंगज् हा संघ ज्ञान प्रीमियर लीग २०२४ (पर्व पहिले) चा पहिला मानकरी ठरला या सामन्यात अक्षय जऱ्हाड या खेळाडूने उत्कृष्ट फलंदाजी करत मॅन ऑफ द मॅच चा किताब पटकावला तसेच या स्पर्धेत अनेक बक्षिसे देण्यात आली.

त्यातील मॅन ऑफ द सिरीज हा किताब अक्षय जऱ्हाड यांना अनिल शिंदे यांच्या हस्ते देण्यात आला तसेच उत्कृष्ट फलंदाज- अमन शेख,उत्कृष्ट गोलंदाज- शेखर पटेकर ,उत्कृष्ट क्षेत्ररक्षण- विजय लोणारी व उत्कृष्ट यष्टीरक्षक- मेजर पांडुरंग गजे यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरच्या हस्ते बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला. त्यातील पहिले पारितोषिक १ लाख रुपये हे ज्ञान फाउंडेशन च्या सर्व सदस्याच्या हस्ते छत्रपती शिवाजी किंगज् या संघाला देण्यात आले, दुसरे पारितोषिक ७१ हजार रुपये हे जनता गॅरेज या संघाला नेत्रालॉन्स चे मालक अनिल भाऊ डौले व जगताप बंधु मिठाईवाले चे मालक अजिंक्य जगताप यांच्या हस्ते देण्यात आले, तृतीय पारितोषिक 51 हजार रुपये हे मक्तापूर ब्लास्टर या संघाला विकास फर्निचर व शेरा गोल्ड चहा चे मालक कमलेश ओस्तवाल यांच्या हस्ते देण्यात आले,

छत्रपती शिवाजी किंगज्

तसेच चतुर्थ पारितोषिक ३५ हजार रुपये दहिवळकर सराफ या संघाला जहीर बागवान व डॉ.काकासाहेब गंडाळ यांच्या हस्ते देण्यात आले या पारितोषिक सोहळ्यास अनेक मान्यवर उपस्थित होते त्यात मारुतीराव घुले पाटील पतसंस्थेचे चेअरमन नंदकुमार पाटील, अनिल डौले,अजिंक्य जगताप, कमलेश ओस्तवाल,जहीर बागवान,अभय शेठ गुगळे, राजेंद्र रासने,सतीश पिंपळे, डॉ.अविनाश काळे,महेश मापारी,सतीश गायके, विनायक नळकांडे,अनिल शिर्के,राजेंद्र वाघ,अनिल शिंदे, अन्सार बागवान या मान्यवरांची उपस्थिती लाभली. ज्ञान फाउंडेशन चे मार्गदर्शक व उत्कृष्ट डिझायनर सागर गंधारे,अध्यक्ष आदित्य खंडाळे, संदीप वीर ,

अनिल अरगडे, विजय गायकवाड ,समीर घुले,महेश देवढे,ॲड. प्रदीप पाठे, श्रीपाद कुलकर्णी व निलेश खंडाळे यांनी अथक अरिश्रम करुन ही स्पर्धा पार पाडली त्याच बरोबर ज्ञान फाउंडेशनला विशेष सहकार्य लाभलेले ते सुदर्शन क्रिकेट अकादमी, पसायदान स्पोर्ट्स क्लब, गुड मोर्निंग क्लब, पोलीस मित्र,पत्रकार मित्र व सर्व बक्षीसदाते यांचे आभार फाउंडेशन चे सदस्य ॲड. प्रशांत पाठे यांनी मानले. या सर्व कार्यक्रमाचे सुत्र संचलन देवीदास साळुंके यांनी केले.

newasa news online
छत्रपती शिवाजी किंगज्

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

छत्रपती शिवाजी किंगज्
छत्रपती शिवाजी किंगज्

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

छत्रपती शिवाजी किंगज्
error: Content is protected !!