ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

मारहाण


गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील वंजारवाडी येथील मारहाण प्रकरणातील आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
दि. ६ फ्रेबुरवारी रोजी सोनई पोलीस ठाण्यात वंजारवाडी येथील आदिनाथ नवनाथ दहिफळे यांनी आपल्याला झालेल्या मारहाण प्रकरणी फिर्याद दाखल केली होती. फिर्यादी दहिफळे हे स्वत:च्या शेतातील गवत कापण्यासाठी गेले होते. त्याच वेळी त्याठिकाणी आरोपी शिवाजी गेणु डोळे, राम शिवाजी डोळे दोघे रा. वंजारवाडी यांनी फिर्यादीस पाईपलाईन व बांधाचे कारण पुढे करत शिवीगाळ व दमदाटी करत लोखंडी राॅडने मारहाण केली होती.

मारहाण

त्यामुळे आरोपी विरुद्ध गुन्हा र. नं. ५०/२०२४ भा. द. वी. कलम ३२६,३२४,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींनी अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी केलेला अर्ज मा. न्यायलयाने फेटाळून लावल्याने अखेर आरोपी सोनई पोलीस ठाण्यात हजर झाले. त्यांना रितसर अटक करून दि. ७ रोजी नेवासा येथील न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना मा. न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

मारहाण
मारहाण

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

मारहाण
मारहाण

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

मारहाण
Share the Post:
error: Content is protected !!