ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

वृक्षारोपण

जैनपूर – नेवासा तालुक्यातील जैनपूर येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. गावातील नूतन ग्रामसेविका कावेरी चांदोरे यांनी स्वखर्चाने दहा हजार रुपयाची नारळाची झाडे ग्रामपंचायत परिसर व मराठी शाळा परिसर येथे लावली तसेच ग्रामपंचायत यांच्यावतीने मराठी शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला एक फळझाड ते जोपासण्याचे काम करण्याचा सल्ला दिला तसेच गावात यापुढे देखील अनेक ठिकाणी वृक्षारोपण केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले ग्रामीण भागातील ग्रामपंचायत असून देखील वृक्षारोपण साठी पुढे येत आहे.

वृक्षारोपण

त्यामुळे इथून पुढे सर्वांनी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून निसर्गाची जोपासना करावी जोपर्यंत या गावात काम करत आहे तोपर्यंत हरित गाव संकल्पना राबविणार असल्याचे असे कावेरी चांदोरे यांनी सांगितले. यावेळी संदीप डिके यांनी सांगितले की सामाजिक जाणीव असलेले ग्रामसेवक आम्हाला मिळाले याचे समाधान वाटत आहे. याप्रसंगी सरपंच सौ शैला शिरसाट, उपसरपंच कानिफनाथ डिके,संदीप डिके, किशोर शिरसाट, ग्रामसेवक सौं कावेरी चांदोरे,दीपक गव्हाणे, भारत बर्डे,किरण डिके, संजय नागरे,राजेंद्र नागरे, महेश डिके ,सचिन डिके, बाळासाहेब डिके, गणेश जवादे, धनंजय डिके, दादासाहेब तागड मुख्याध्यापक दत्तात्रय पटारे, सुनील डिके तसेच मराठी शाळेतील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

वृक्षारोपण
वृक्षारोपण
वृक्षारोपण

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

वृक्षारोपण
वृक्षारोपण

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

वृक्षारोपण
error: Content is protected !!