ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

ज्ञानेश्वर महाविद्यालय

नेवासा – मुळा एज्युकेशन सोसायटीच्या श्री ज्ञानेश्वर महाविद्यालय नेवासा येथे बारावी परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार समारंभ सोहळा आयोजित केला होता. यावेळी कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील एकूण ३४ विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर पालक प्रतिनिधी म्हणून दिवाणी न्यायाधीश गजानन यादव, महाविद्यालय विकास समितीचे अभय गुगळे, महेश मापारी, संजय थोरात, माजी उपप्राचार्य दशरथ आयनर, उपप्राचार्य प्रा.राधाताई मोटे, प्राचार्य डॉ.गोरक्षनाथ कल्हापुरे उपस्थित होते.

दिवाणी न्यायाधीश गजानन यादव म्हणाले, “कॉलेजच्या वयात विद्यार्थ्यांना शिस्त लावणे महत्त्वाचे असते. ती शिस्त या श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयात मला दिसली. पालक म्हणून मी माझ्या मुलीच्या प्रगतीवर खुश आहे. आयुष्याचा प्रवास करायचा कि ध्येयहीन भटकंती करायची हे विद्यार्थ्याने ठरवायचे आहे. या वयात मान खाली घालून अभ्यास केला तर आयुष्यात कधीही मान खाली घालून जगायची वेळ येणार नाही. तुम्ही नेहमी ताठ मानेने जगाल.”

ज्ञानेश्वर महाविद्यालय

महाविद्यालय विकास समिती सदस्य महेश मापारी म्हणाले, “विद्यार्थ्यानो तुम्ही जीवनाच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर उभे आहात. कोणत्या दिशेने जायचे हा निर्णय अतिशय काळजीपूर्वक घ्यावा लागणार आहे. या निर्णयावर जीवनाचे यश अवलंबून असणार आहे. चांगला माणूस होण्याचा प्रयत्न करा. कारण चांगला माणूस होणे हेच खरे यश आहे.”

प्राचार्य डॉ.गोरक्षनाथ कल्हापुरे म्हणाले, “ मुळा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष उदयन गडाख यांनी वाढती स्पर्धा व बाजारपेठेतील आवश्यक ते बदल ओळखून श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयात पारंपारिक कोर्सेस सोबतच व्यावसायिक कोर्सेस सुरु केले आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालय दर्जेदार शिक्षण देत आहे.”

यावेळी आदिती यादव, हुन्नेन सय्यद, अथर्व आवटे, कांचन जाधव या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात उत्तुंग यश मिळविण्याचा निर्धार केला. तसेच नरेंद्र काळे, पोपट आवटे, मधुकर सरगैय्ये, अशोक खोसे व सौ.संगिता जाधव या पालकांनी आपल्या मनोगतात पाल्यांच्या यशावर व महाविद्यालयावर खुश असल्याचे सांगितले. माजी उपप्राचार्य प्रा.दशरथ आयनर यांनी विद्यार्थ्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. उपप्राचार्य प्रा. राधाताई मोटे यांनी पाहुण्यांचे स्वागत व कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रा. देविदास साळुंके यांनी निवेदन केले. तर आभार प्रदर्शन प्रा. हरिश्चंद्र माने यांनी केले.

newasa news online
ज्ञानेश्वर महाविद्यालय

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

ज्ञानेश्वर महाविद्यालय
ज्ञानेश्वर महाविद्यालय

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

ज्ञानेश्वर महाविद्यालय
error: Content is protected !!