ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

सुंदर हस्ताक्षर

नेवासा – आज सोमवार दिनांक 24 जून रोजी नेवासा शहरातील कै .सौ .सुंदरबाई हिरालाल गांधी कन्या विद्यालय नेवासा या शाळेमध्ये वळणदार व सुंदर हस्ताक्षर कसे काढावे यासंदर्भात विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यासाठी अ हमदनगर येथील श्री . अशोक मनोहर सप्तर्षी यांचे मार्गदर्शन विद्यार्थिनींना मिळाले सुरवातीला श्री सप्तर्षी यांनी सुंदर व वळणदार अक्षरामुळे परीक्षेत गुणवत्ता वाढीसाठी निश्चितपणे उपयोग होतो याचे स्पष्टीकरण वेगवेगळ्या उदाहरणांद्वारे केले. सुंदर अक्षर हा एक दागिना आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचे अक्षर वळणदार व सुंदर असावे यासंदर्भात विद्यार्थ्यांना योग्य वयामध्ये योग्य मार्गदर्शन मिळाले तर निश्चितपणे त्यांचे अक्षर वळणदार व सुंदर होते .

सुंदर हस्ताक्षर

कार्यक्रमासाठी समर्पण फाउंडेशनचे संस्थापक डॉ . करण घुले उपस्थित होते त्याचबरोबर त्यांचे सहकारी डॉक्टर संजय सुकाळकर हेही उपस्थित होते कार्यक्रमाप्रसंगी डॉ .श्री सुकाळकर यांनी सुंदर हस्ताक्षरामुळे आपल्या जीवनामध्ये कसा बदल होतो त्याचप्रमाणे आपल्या व्यक्तीमत्त्वांमध्ये कसा सकारात्मक बदल होतो याचे उदाहरणासह स्पष्टीकरण केले सुरुवातीला विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती पानसरे मॅडम यांनी श्री अशोक सप्तर्षी यांचा सत्कार केला त्याचबरोबर पर्यवेक्षक श्री मारकळी सर यांनी डॉ . करण घुले यांचा सत्कार केला तसेच ज्ञानोदय इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक श्री पवार सर यांनी डॉ.श्री संजय सुकाळकर यांचा सत्कार केला .

कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात विद्यार्थिनी आणि विद्यार्थी उपस्थित होते . अनेक विद्यार्थिनींनी वळणदार व सुंदर हस्ताक्षर या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी प्रत्यक्ष संपर्क साधला .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन श्री शरद व्यवहारे सरांनी केले.

newasa news online
सुंदर हस्ताक्षर

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

सुंदर हस्ताक्षर
सुंदर हस्ताक्षर

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

सुंदर हस्ताक्षर
error: Content is protected !!