ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

ढगे

नेवासा –तालुक्यातील प्रवरासंगम येथे भारतीय कृषक समाज पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष डॉक्टर सुभाष नलांगे तसेच कार्याध्यक्ष डॉक्टर संजय देशमुख यांच्या उपस्थितीत मार्गदर्शन करण्यात आले सौ निर्मलाताई अशोकराव ढगे यांची नियुक्ती प्रदेश अध्यक्ष भारतीय कृषक समाज डॉक्टर सुभाष नलांगे यांनी केली त्या संदर्भातील नियुक्तीपत्र त्यांना प्रदान करण्यात आले या प्रसंगी खेडले काजळी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी ची मा व्हॉइस चेअरमन हरदास पाटील ढगे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.

ढगे

याप्रसंगी बोलताना सौ. ढगे यांनी सांगितले की प्रवरा संगम परिसरात महिलांसाठी बचत गटामार्फत व भारतीय कृषी समाज अंतर्गत छोटे उद्योग व व्यवसाय सुरू करता येणे शक्य आहे यामध्ये नवीन प्रकल्पात छोटे तेल घाणे, गोमुत्रापासून विविध आयुर्वेदिक औषधे व त्यासाठी उर्ध्वपतन प्रयोगशाळा तसेच विविध शेतीच्या मालापासून वापरा आणि फेका अशा नैसर्गिक वस्तू उदाहरणार्थ ग्लास द्रोण पत्रावळी करणे शक्य आहे त्यामुळे प्लास्टिकचा उपयोग कमी करता येईल नैसर्गिक वस्तू कुजवल्या जातात व त्यापासून त्वरित खत तयार होते मात्र प्लास्टिक कुजत नाही छोट्या वस्तूंचा व्यवसाय महिला बचत गटामार्फत महिलांच्या सहकाऱ्यांनी सुरू करता येईल राज्य पातळीवरील बैठकीच्या शेवटी कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर अशोकराव ढगे यांनी ऋणनिर्देश व्यक्त केले.

ढगे
ढगे

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

ढगे
ढगे

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

ढगे
error: Content is protected !!