ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

राम

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील गणेशवाडी येथे श्रीराम नवमी ते हनुमान जन्मोत्सव निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १६ एप्रिल ते २३ एप्रिल या कालावधीत प्रथम दिनी ज्ञानेश्वर महाराज जोशी बेल्हेकरवाडी,व ह. भ. प. रामेश्वर महाराज राऊत (शास्रीजी) यांचे हस्ते ध्वजारोहण व ह. भ.प. पंढरीनाथ महाराज तांदळे यांचे हस्ते दिप प्रज्वलन होऊन कार्यक्रमास सुरुवात होईल. अखंड हरिनाम सप्ताह मध्ये पहाटे ४ते ६ काकडा भजन, सकाळी ७ ते ८ आरती, ८ ते ११ सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण , सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ, ७ ते ९ हरि किर्तन, ९ ते १० भोजन. दि. १६ एप्रिल रोजी ह. भ. प. सुदर्शन महाराज शास्री त्रिभुवनेश्वर देवस्थान त्रिभुवनवाडी, दि १७ एप्रिल रोजी ह. भ. प. इंद्रजित महाराज रसाळ बिड, दि. १८ एप्रिल रोजी संज चरणरज बाळकृष्ण महाराज वसंतगडकर ,

राम

दि १९ एप्रिल रोजी स्वामी अरुणाथगिरीजी महाराज श्री क्षेत्र अडबंगनाथ संस्थान भामाठाण, दि. २० एप्रिल रोजी ह. भ. प. भागवताचार्य गणेश महाराज वारंगेवारंगे बिड, दि २१रोजी एप्रिल रोजी ह. भ. प महंत आदिनाथ महाराज शास्री श्री क्षेत्र तारकेश्वर गड, दि. २२ एप्रिल रोजी ह. भ. प. रविदास महाराज शिरसाठ, आळंदी, अंतिम दिनी . २३ एप्रिल रोजी सकाळी ६ श्रींचा अभिषेक , ७ ते ९ गंगा कावड, ग्रंथ मिरवणूक, सकाळी १० ते १२ ह. भ. प. रामेश्वर महाराज शास्री सदगुरू पंढरीनाथ महाराज वारकरी शिक्षण संस्था घोडेगाव यांचे काल्याचे किर्तन होऊन नारायण बंकट दहिफळे व रोहिदास तांदळे पित्यर्थ अमोल रोहिदास तांदळे यांचे वतीने महाप्रसाद वाटप होईल. सायंकाळी ७ ते ९ छबिना मिरवणूक होईल असे हनुमान यात्रा उत्सव कमिटी व समस्थ ग्रामस्थ भजनी मंडळ गणेशवाडी यांचे वतीने कळविण्यात आले आहे.

राम
राम

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

राम
राम

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

राम
error: Content is protected !!