ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Manoj jarange

Maratha OBC Reservation : मनोज जरांगे(Manoj Jarange) पाटील यांनी आंतरवाली सराटीत आमरण उपोषण करुन राज्यभरात मोठे वादळ निर्माण केले होते. मात्र, आता पोलिसांनी त्यांच्या आमरण उपोषणाला परवानगी नाकारली आहे. याचे काय पडसाद उमटणार?

Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आमरण उपोषण करुन राज्यभरात रान पेटवणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली आहे. मनोज जरांगे हे शनिवारपासून पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी आमरण उपोषणाला बसणार होते. मात्र, पोलिसांनी आता त्यांना परवानगी नाकारल्याने मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) काय करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. यापूर्वी मराठा आरक्षण आंदोलनाचे केंद्र असलेल्या आंतरवाली सराटीच्या (antarwali sarati ) गावकऱ्यांनी मनोज जरांगे पाटील यांना आमरण उपोषणाला विरोध केला होता. त्यानंतर आता पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना आमरण उपोषण करण्यापासून रोखण्याचा निर्णय घेतल्याने त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. 

चार दिवसांपूर्वी  अंतरवलीच्या गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना  निवेदन दिले होते. तसेच आजूबाजूच्या गावातील दिलेल्या निवेदनावरून प्रशासनाने जातीय सलोखा बिघडण्याची शक्यता तसेच ग्रामपंचायतच्या कामांना अडथळा आणि महिला आणि शालेय विद्यार्थ्यांना होणारा त्रास लक्षात घेता पोलिसांकडून जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला परवानगी नाकारण्यात आल्याचे समजते. याशिवाय, उपोषणाच्या जागेबाबत ग्रामसभेचे कोणतीही कागदपत्रं सादर न केल्यामुळे जरांगे पाटील यांना ही परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange Patil) हे शनिवारपासून पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवाली सराटीत आमरण उपोषण करणार होते. मात्र, येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत त्यांच्या उपोषणास परवानगी नाकारावी अशी मागणी केली होती. त्यानंतर पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना आमरण उपोषण करणार परवानगी नाकारली. आंतरवाली सराटीत नंतर आता जरांगे पाटील यांच्या उपोषणास आता आणखी दोन गावाने विरोध केला आहे. वडीगोद्री आणि दोडगाव येथील नागरिकांनी जरांगे पाटील यांच्या उपोषणाला विरोध केला आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणाला परवानगी मिळू नये यासाठी येथील ग्रामस्थांनी तहसीलदारांना पत्र दिले आहे.

आंतरवाली सराटी गावातील उपसरपंचांसह 70 जणांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन जरांगेंच्या आंदोलनामुळे गावातील जातीय सलोखा बिघडत असल्याचे म्हटले होते. प्रशासनने या उपोषणास परवानगी देऊ नये, गावात आणि परिसरात जातीय सलोखा बिघडत असल्याने उपोषणास परवानगी देऊ नये अशी मागणी ग्रामस्थांनी या निवेदनातून केली होती. अंतरवाली सराटी गावच्या उपसरपंचासह 5 ग्रामपंचायत सदस्यांनी मनोज जरांगे यांच्या गावातील उपोषणाला उघडपणे विरोध केला होता. याबाबतचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले असून या निवेदनावर 70 गावकऱ्यांच्या सह्या आहेत. त्यामुळे, जरांगे यांचं उपोषण वादात सापडले होते.

Manoj Jarange

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Manoj Jarange
Manoj Jarange

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Manoj Jarange
error: Content is protected !!