ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

पत्रकार

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित केले होते आयोजन..

सोनई : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ पिंपरी चिंचवड शाखेच्या माध्यमातून पत्रकारितेसह सामाजिक जाणिवेचे भान ठेवून अनेक उपक्रम राबवत असतात. त्याचाच एक भाग म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे अनेकांनी संघाचे आभार मानून आशीर्वाद दिले. यावेळी अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणि समाधान दिसून आलं. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ पिंपरी चिंचवडच्या वतीने पिंपरी येथील आंबेडकर पुतळा चौक येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.

पत्रकार

यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ पिंपरी चिंचवड यांच्या वतीने वह्या, पेन व खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रेस संपादक पत्रकार सेवा संघ पुणे पिंपरी चिंचवडच्या महिला शहराध्यक्षा व सा. पालिका संदेशच्या संपादिका सौ मंदा संजय बनसोडे, पिंपरी चिंचवड उपाध्यक्षा सा. वंचित विचारच्या संपादिका सौ उषा लोखंडे यांच्यासह पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. भारतीय घटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, महामानव, भारतरत्न, बोधिसत्व, आधुनिक भारताचा पाया रचणारे ज्ञानाचा अथांग महासागर, डॉ. बासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या १३३ व्या जयंती निमीत्त अभिवादन करण्यासाठी पिंपरी चौक येथे लाखोंच्या संख्येने लोक येतात. यावर्षीही प्रखर उन्हाची तमा न बाळगता हजारो अनुयायी यांची सकाळपासूनच उपस्थिती होती . त्यांनी देश व समाजाच्या विकासासाठी आपलं आयुष्य वेचलं.

यावेळी तानुल्या मुलांसह महीला अबालवृद्ध, दिव्यांग बांधवांसह तरुणाईची मोठी उपस्थिती होती. रखरखत्या उन्हात देखिल भीम अनुयायांची गर्दी वाढत होती, दुपारनंतर ते रात्री बारा वाजेपर्यंत अनेक ठिकाणच्या मिरवणुकी डिजेच्या तालावर नाच गाण्यांसह भिमगितानी परीसर दुमदुमला होता.

पत्रकार
पत्रकार

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

पत्रकार
पत्रकार

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

पत्रकार
error: Content is protected !!