ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Nilesh lanke

Nilesh Lanke  :  लोकसभा निवडणूक किंगमेकरची भूमिका बजावणारे बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आहेत, असं नगर लोकसभेचे मविआचे उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) म्हणाले आहेत.

Nilesh lanke :  लोकसभा निवडणूक किंगमेकरची भूमिका बजावणारे बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आहेत, असं नगर लोकसभेचे मविआचे उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) म्हणाले आहेत. “आपण ज्यांना पाच वर्षे संसदेत पाठवले त्यांनी एकदाही शेतकऱ्यांचे मुद्दे संसदेत उपस्थित केले नाहीत. गोर गरिबांच्या समस्या सोडवण्यासाठी सत्ता असते पण त्यांनी सत्ता फक्त प्रतिष्ठेसाठी वापरली. एकदा तुमच्या भावाला संधी द्या, ताजनापूरचा प्रश्न सोडवू. समोरच्या उमेदवाराने परावभ स्वीकारला आहे. माझ्याच नावाच्या एका व्यक्तीला अर्ज भरायला लावला , , त्याला बँडमधील पिपाणी चिन्ह घ्यायला सांगितले. ज्याच्या पायाखालची वाळू सरकते तो असे उद्योग करतो. आता तर लोकच तुमचा बँड  वाजणार आहे”, असं निलेश लंके म्हणाले. नगरमध्ये लंके यांच्या प्रचारार्थ मविआची सभा पार पडली. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) उपस्थित होते. 

Nilesh lanke

निलेश लंकेच्या मागे फिरला तर खोटेनाटे गुन्हे दाखल केले जातात

निलेश लंके म्हणाले, आम्ही आमच्या लोकांना संरक्षण देण्यासाठी समर्थ आहोत. निवडणूक लागल्यापासून पोलीस आणि प्रशासनाने आम्हाला किती त्रास दिला, याची आमच्याकडे नोंद आहे. आम्ही एखाद्याला कार्यकर्त्यांच्या हॉटेलवर बसलो तरी दुसऱ्या दिवशी रेड टाकतात.  आमच्या बरोबर कार्यकर्त्या फिरला तर त्याला धमकावण्याचा प्रयत्न केला जातो. निलेश लंकेच्या मागे फिरला तर खोटेनाटे गुन्हे दाखल केले जातात. लोकसभेच्या निवडणुकीसाठी तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी मी इथे आलेलो आहे, असंही निलेश लंके यांनी सांगितलं. 

वीस रुपयाला बिसलेरी आणि 22 रुपयाला दुध अशी परिस्थिती झाली आहे

पुढे बोलताना लंके म्हणाले, देशाचे नेते शरद पवार आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात उपस्थित असताना मी  आशीर्वाद घेण्यासाठी आलोय. लोकसभेची निवडणूक देशाची भवितव्य ठरवणारी आहे. डॉ. आंबेडकरांचे संविधान वाचवण्यासाठी आपल्याला निवडणुकीला सामोरे जायचय. आपल्या शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही. सरकार म्हणतय शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे. दुधालाही भाव नाही. वीस रुपयाला बिसलेरी आणि 22 रुपयाला दुध अशी परिस्थिती झाली आहे. पवार साहेबांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. निवडणूकीला सामोरे जाताना सांगतो की, ज्यांना आपण 5 वर्षांपूर्वी संसदेत पाठवलं. त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले नाहीत, असेही लके यांनी सांगितले. 

Nilesh lanke

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Nilesh lanke
Nilesh lanke

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Nilesh lanke
Share the Post:
error: Content is protected !!