ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

ग्रामपंचायत

गणेशवाडी – घोडेगाव ग्रामपंचायत सध्या प्रशासक असल्याने असुन अडचण नसून खोळंबा असे बोलण्याची वेळ सध्या ग्रामस्थांना आली आहे. मागील महिन्यात पाणी पुरवठा योजना विहिरी वरील विद्युत पंप नादुरुस्त झाल्याने पाणी पुरवठा होत नव्हता. तेविस दिवसांपासुन पंप जळाला. मात्र दुरुस्तीसाठी बुधवारी तो विहिरीतुन बाहेर काढला . अगोदरच चार पाच दिवसा आड पाणी येते . ते आता आठ दिवस पासुन मिळत नासल्याने नागरिकांचे पाण्यावाचुन ऐन पावसाळ्यात हाल होत आहेत.
पिण्याचे पाणी सोडण्यासाठी वेळापत्रक नाही. मनमानी पध्दतीने पाणी वाटप केले जाते.

पाणी सोडण्यासाठी प्रत्येक प्रभागात ठराविक वेळ असावी व योग्य दाबाने पाणी मिळावे अशी नागरिक मागणी करत आहेत.
येथे ग्रामपंचायत मधे प्रशासकीय कारभार आहे. प्रशासक ग्रामपंचायत कार्यालयात कधी येतात नागरिकांना समजत ही नाही. तर ग्रामसेवक ३१मे रोजी सेवा निवृत्त झाले. त्यांच्या जागी आलेले ग्रामसेवक ही कोण आहेत ? ते ही कार्यालयात उपस्थीत नसल्याने नागरिकांनी तक्रार कोणा कडे करावी.असा प्रश्न पडला आहे. .पाणी आणखी विज या दुहेरी संकटाने नागरिक हैराण झाले आहेत.

संबधीत विभागाने योग्य ती दखल घ्यावी.सध्या पावसाळ्याचे दिवस आहे. विज वितरण कंपनीने विज खांब, तारांवर झाडांचा अडथळा होतो .ती झाडांची छाटणी करण्यासाठी तीन चार दिवसांपासुन आठ ते दहा तास विज बंद ठेवत आहे. तशीही गेल्या पंधरा दिवसांपासून वीज अनेक वेळा गायबच असते म्हणा. या ना सारख्या अनेक समस्यांना सध्या घोडेगाव ग्रामस्थांना तोंड द्यावे लागत आहे.

ग्रामपंचायत
ग्रामपंचायत

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

ग्रामपंचायत
ग्रामपंचायत

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

ग्रामपंचायत
error: Content is protected !!