ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

ज्ञानेश्वर

नेवासा – संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर नेवासा येथे जगाच्या कल्याणासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी ग्रंथाची रचना केली.पैस खांबाच्या दर्शनासाठी हजारो भाविक भक्त येत असतात . पुढील काही दिवसा वरती आषाढी एकादशी व कमिका एकादशीच्या निमित्ताने मोठा उत्सव असतो एकादशी जवळ आली असून रस्त्यावरील व बाजूची साईट पट्टी अद्यापही सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामाकडे दुर्लक्ष केलेले असून संस्थांकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे.

ज्ञानेश्वर

त्याचबरोबर नेवासा ते खडका फाटा रोड या रोडवर देखील खड्डे असल्याकारणाने येणाऱ्या दिंडी व पायी येणाऱ्या वारकऱ्यांना मोठी कसरत करावी लागणार असून एकादशीच्या अगोदर या रस्त्यावर पडलेल्या खड्डे बुजवणे अत्यंत आवश्यक असून आपण लवकरात लवकर लक्ष घालून कामास सुरुवात करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष रोहित पवार यांनी केली आहे.यावेळी सार्वजनिक बांधकामा विभागाचे अधिकारी यांना निवेदन देऊन त्यांना समज देण्यात आली.यावेळी नगरसेवक सुनील वाघ, ओबीसी जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब शिरसागर, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस प्रतीक शेजुळ, कामगार मोर्चा तालुकाध्यक्ष विवेक नन्नवरे, शहर उपाध्यक्ष शंकर कनगरे, युवा मोर्चा शहराध्यक्ष श्रीकांत बर्वे, युवा मोर्चा शहर सरचिटणीस किरण लष्करे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

newasa news online
ज्ञानेश्वर

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

ज्ञानेश्वर
ज्ञानेश्वर

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

ज्ञानेश्वर
error: Content is protected !!