ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

अजिज शेख

घोडेगाव – सध्या उल्हास नगर म न पा चे आयुक्त असलेले घोडेगाव चे सुपुत्र अजिज करिम शेख यांचीआय ए एस पदी निवड झाली आहे.३१मे रोजीते आयुक्त पदावरून निवृत्त होणार होते. मात्र आता त्यांना दोन वर्ष मुदतवाढ मिळाली आहे.नोव्हेंबर २३च्या पहिल्या आठवड्यात भारतीय प्रशासन सेवेत नियुक्ती साठी घेण्यात आलेल्या राज्य स्तरीय ऑनलाईन लेखी परिक्षेत अजिज करिम शेख यांनी बाजी मारली. शेख यांनी २८१अधिका-यामधे १३ वा क्रमांक मिळवुन दिल्ली येथे होणा-या यु पी एस सी परिक्षेसाठी पात्र ठरले. २९ नोव्हेंबर २३ रोजी भा प्र सेवेत निवडीने नियुक्ती करिता बिगर राज्य नागरी सेवेतील अधिकाऱ्यांची १०० गुणांची ऑनलाईन लेखी परिक्षा आय बी पी एस मुंबई मार्फत घेण्यात आली होती.

या परिक्षेसाठी २८१ अधिकारी उपस्थित होते. परिक्षेचा निकाल लागल्यानंतर त्यात ५१गुण मिळवुन शेख यांचा १३वा क्रमांक आला.या परिक्षेतील प्रथम २० मधे येणारे अधिकारी दिल्ली येथे होणा-या यु पी एस सी परिक्षेसाठी पात्र ठरले होते. त्यात शेख यांचा समावेश होता. अजिज शेख हे१९९४ बॅचचे अधिकारी असुन त्यांनी नागपूर, मिरा भाईंदर,कल्याण डोंबिवली ,नवी मुंबई म न पा मधे उपायुक्त पदी काम केले आहे. तर काही वर्षांपूर्वी पदोन्नती नंतर धुळे येथे नियुक्ती मिळाली १३ जुलै १९२२ पासुन ते उल्हासनगर म न पा मधे आयुक्त पदी आहेत. ३१मे १९२२४ रोजी शेख हे आयुक्तपदावरून निवृत्त होणार होते. त्यांचा सेवापुर्ती कार्यक्रम शाहिद जनरल अरुणकुमार वैद्य सभागृह येथे आयोजीत करण्यात आला होता. आय ए एस पदी निवड झाल्याने आता दोन वर्ष मुदत वाढ मिळाली आहे.

अजिज शेख

घोडेगाव चे सुपुत्र अजिज शेख हे अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत श्री घोडेश्वरी माध्य विद्यालयात शिक्षण घेतले. मात्र जिद्द व चिकाटीच्या जोरावर त्यांनी एम पी एस सी पास होऊन उपायुक्त पदी नियुक्त झाले. निवृत्तीचा क्षण आला असतानाही यु पी एस सी मधे पास होऊन पुन्हा दोन वर्षं मुदत वाढी चे गिफ्ट त्यांना मिळाले. घोडेगाव येथील म्हशीचे व्यापारी अजिम शेख यांचे अजिज शेख हे लहान बंधु आहेत .त्यांच्या निवडी बद्दल घोडेगाव व परिसरातील नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.घोडेगाव मधील ते पहिले आय ए एस अधिकारी ठरले आहेत.

newasa news online
अजिज शेख

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

अजिज शेख
अजिज शेख

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

अजिज शेख
error: Content is protected !!