ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

होमगार्ड

होमगार्ड दलाचे निष्काम सेवेचे कार्य कौतुकास्पद- कल्याणराव उभेदळ

नेवासा – महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने नेवासा येथील होमगार्ड कार्यालयात आदर्शगाव सुरेशनगरचे सरपंच कल्याणराव उभेदळ यांच्यात हस्ते ध्वजारोहण करण्यात येऊन देशाच्या तिरंग्याला मानवंदना देण्यात आली.होमगार्ड दलाचे निष्काम सेवेचे कार्य कौतुकास्पद असून होमगार्डच्या प्रश्नांकडे सरकारने लक्ष देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन यावेळी कल्याणराव उभेदळ यांनी यावेळी बोलताना केले.
   नेवासा येथील होमगार्ड कार्यालयाच्या  प्रांगणात महाराष्ट्र दिनी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी होमगार्ड कार्यालयाचे समादेशक कमांडर पत्रकार बाळासाहेब देवखिळे यांनी आलेल्या अतिथींचे स्वागत केले. पलटणनायक श्रीकांत ससे यांनी संचलन केले तर पलटणनायक अशोक टेमकर यांनी मानवंदना दिली. सरपंच कल्याणराव उभेदळ यांच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात येऊन ध्वजारोहण करण्यात आले.

होमगार्ड

यावेळी झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी कमांडर बाळासाहेब देवखिळे यांनी होमगार्डच्या वाटचालीची माहिती दिली.नवीन इमारतीच्या जागेसाठी सरकारकडे पाठपुरावा करणार असून त्यादृष्टीने पाऊले उचलली जाईल असे सांगून उपस्थित होमगार्ड जवान व महिला होमगार्डना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना कल्याणराव उभेदळ म्हणाले की पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून होमगार्ड दल संकटाच्या काळात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन निष्काम सेवा मानधनावर समाधान मानून देत आहे.

कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी योगदान देणाऱ्या होमगार्ड दलाला कायम वेतन व्यवस्था शासनाने द्यावी त्यासाठी प्रयत्न व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करत समाजाच्या संरक्षणासाठी कार्य करणाऱ्या होमगार्ड दलाला लोकसहभागातून पाठबळ देत राहू अशी ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली. यावेळी सुरेशनगरचे माजी उपसरपंच भाकचंद पाडळे, होमगार्ड कार्यालय प्रमुख अल्ताफ शेख,गफ्फार शेख संगिता सावंत यांच्यासह होमगार्ड जवान मोठ्या संख्येने उपस्थित होते.होमगार्डचे जनसंपर्क अधिकारी पत्रकार सुधीर चव्हाण यांनी सूत्रसंचालन करून उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.

होमगार्ड
होमगार्ड

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

होमगार्ड
होमगार्ड

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

होमगार्ड
error: Content is protected !!