ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

भाऊसाहेब

सोनई – शिर्डी लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचारार्थ सोनई ता नेवासा येथे सोम दि 6 मे 2024 रोजी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे,माजी मंत्री आ शंकरराव गडाख, आ नितीन देशमुख,आ सुनील शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली याप्रसंगी हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. याप्रसंगी उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांनी
13 मे रोजी मशाल चिन्हा समोरील बटन दाबून विजयी करावे असे आवाहन केले तसेच नेवासा तालुक्यातील गावा,गावातील विकासकामे आ शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली मार्गी लावणार असल्याचे सांगितले व विरोधी उमेदवार यांनी गेल्या दहा वर्षात शिर्डी मतदार संघ विकासापासून वंचीत ठेवल्याचा आरोप केला.यावेळी बोलताना आ शंकरराव गडाख यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले व म्हणाले उद्धव ठाकरे यांच्या बरोबर प्रामाणिक असल्यामुळे विविध विकास कामांना अडचणी निर्माण होत आहेत तरीही निष्ठेने काम करून भाऊसाहेब वाकचौरे यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. जाणीवपूर्वक दिला जाणारा त्रास माझ्यासह ,तालुक्याच्या वाट्याला आले असल्याचे आ गडाख म्हणाले चांगली परिस्थिती नसलेल्या कारखान्यांना बँकेची थकहमी दिली जाते परंतु चांगली परिस्थिती असलेल्या कारखान्यांना फक्त राजकीय भूमिकेतून अडवणूक केली जाते याविषयी त्यांनी खंत व्यक्त केली.

भाऊसाहेब

उद्धव ठाकरे यांचेशी वेळोवेळी झालेल्या चर्चेतुन भाऊसाहेब वाकचौरे यांनी सर्वानुमते उमेदवारी दिली आहे नेवासा तालुक्यावर विशेष जबादारी आहे एकजुटीने प्रयत्न करून भाऊसाहेब वाकचौरे यांना विजयी करू असे आ गडाख म्हणाले याप्रसंगी बोलतांना शिर्डी मतदार संघाचे संपर्कप्रमुख आ सुनील शिंदे यांनी भाजप व शिंदे सेना यांच्यावर जोरदार प्रहार केला व मुंबईसह राज्यभरात महाविकास आघाडीचे उमेदवार राज्यात निवडून येणार असाल्याचे ते म्हणाले व शिर्डी मतदार संघात महाविकास आघाडीच्या उमेदवार यांना विजयी करण्याचे आवाहन केले. शिर्डी मतदार संघाचे निरीक्षक आ नितीन देशमुख म्हणाले आ शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली भर उन्हात हजारो कार्यकर्ते सभेसाठी उभे आहे यातच भाऊसाहेब वाकचौरे यांचा विजय आहे. मोदींच्या राज्यात अनेक सभा घेऊन सुद्धा महायुतीचा जोरदार पराभाव होनार आहे.राज्याचे व देशाचे सरकार जनता विरोधी आहे त्यांना त्यांची जागा निवडणुकीत दाखवून देऊ व उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत वाकचौरे यांना विजयी करण्याचे आवाहन केले. विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते
अंबादास दानवे यांनी केंद्र व राज्य सरकारवर जोरदार प्रहार केला देशाची दिशा ठेवणारी ही निवडणूक असल्याने सर्वांनी काळजीपूर्वक मतदान करावे.

भाजप सरकार फक्त थापा देणारे सरकार आहे.गेल्या 10 वर्षात शिवस्मारक ची साधी वीटही सरकारने लावली नाही. छोट्या गावात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राज्यभरात सभा घ्याव्या लागतात यातच उद्धव ठाकरे यांचे यश आहे. धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्याना जनता माफ करणार नाही. वर्षभर कांद्यावर निर्यात बंदी घालून सरकारने शेतकऱ्यांची लूट केली कापूस उत्पादक व सोयाबीन उत्पादक,तूर उत्पादक शेतकरी यांना उत्पादन खर्च निघणे कठीण झाले आहे
दूध उत्पादक यांनाही अनुदान देण्याची आशा लावली परंतु त्यांचीही पुरती निराशा केली. राज्यात ऑक्टोबर मध्ये महाविकास आघाडीचे सरकार येणार असून आ शंकरराव गडाख यांना मंत्रिपदाची संधी मिळणार आहे
अनेक लोकांना ठाकरे कुटुंबाने पदे दिली परंतु ते सत्तेपुढे लाचार झाले.

आ गडाख यांनी सर्व प्रलोभने दूर सारून उद्धव ठाकरे यांच्या बरोबर राहिले याचा विशेष अभिमान असल्याचे दानवे यांनी सांगितले मशाल चिन्ह घेऊन विशाल विजय संपदान करणार असल्याचे ना अंबादास दानवे यांनी सांगितले.याप्रसंगी अशोकराव गायकवाड, युवा सेनेचे अंकित सुनील प्रभु,कॉ बाबा आरगडे,नवनाथ पठाडे,प्रा कार्ल्स साठे,दादासाहेब चिमणे,देवराम सरोदे,मालोजी गटकळ,जालु येळवंडे आदींनी मनोगत व्यक्त केले
याप्रसंगी प्रमुख उपस्थितांचा सन्मान मा सभापती सुनील गडाख यांनी केला. याप्रसंगी जिल्हाअध्यक्ष रावसाहेब खेवरे,विश्वासराव गडाख,दत्तात्रय काळे,तुकाराम मिसाळ,कॉ बन्सी सातपुते,रामभाऊ जगताप,नंदकुमार पाटील,नानासाहेब नवथर,नानासाहेब तुवर,कडूबाळ कर्डीले, भाऊसाहेब मोटे,रावसाहेब कांगुणे,तुकाराम शेंडे,बाळासाहेब नवले,अझर शेख,गणेश माटे,दादासाहेब गंडाळ, सुधाकर पवार,दादा निपुंगे,बाळासाहेब पाटील,कैलास झगरे,अजित मुरकुटे,डॉ शिवाजी शिंदे,प्रभाकर कोलते,संतोष फिरोदिया, सोपान पेहरे, हरिभाऊ शेळके,मच्छिद्र म्हस्के,बाळासाहेब वाघ आदींसह महाविकास आघाडी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भाऊसाहेब
भाऊसाहेब

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

भाऊसाहेब
भाऊसाहेब

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

भाऊसाहेब
error: Content is protected !!