ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

चारा

शिरेगाव | अविनाश जाधव – महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत सोनई येथील मुळा शिक्षण संस्थेच्या कृषी महाविद्यालयातील कृषिकन्यांनी ग्रामीण कृषी जागरुकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव अंतर्गत चारा प्रक्रिया प्रात्यक्षिक घेतले, या कार्यक्रमा दरम्यान कृषिकन्यांनी चारा प्रक्रियाचे फायदे सांगितले व दुग्ध उत्पादनामध्ये कशी वाढ होईल याचे महत्त्व ग्रामस्थांना पटवून दिले, कृषी महाविद्यालय सोनई येथील कृषीकन्या यांनी शिरेगाव येथे शिरेगाव विविध कार्यकारी सोसायटीच्या प्रांगणात उपस्थित शेतकऱ्यांना ग्रामीण जागृकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव अंतर्गत चारा प्रात्यक्षिक करून दाखवले,

यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आपल्या पशु – जनावरे यांना चारा निर्मिती साठी मोठ्या प्रमाणात मदत निश्चित होणार आहे, तसेच प्रामुख्याने कृषीकन्यानी शेतकऱ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले, यावेळी शिरेगाव ग्रामस्थ शेतकरी उपस्थित होते,
तसेच कृषीकन्या दिक्षा घोडके, कोमल मंडलिक, अक्षदा महाकाळ, आकांक्षा मगर, साक्षी फसाटे, श्रद्धा बोंदर या प्रात्यक्षिक करण्यासाठी उपस्थित होत्या, या कृषी विषयक कार्यक्रमास प्राचार्य डॉ हरी मोरे, उपप्राचार्य प्रा सुनील बोरुडे यांचे सहकार्य मिळाले.

चारा
चारा

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

चारा
चारा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

चारा
error: Content is protected !!