ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

सत्कार

उच्च ध्येय डोळ्यासमोर ठेऊन जीवनाचा शिल्पकार बनण्याचा प्रयत्न करा -राजयोगिनी सरला दीदी

नेवासा – नेवासा येथील प्रजापिता ब्रम्हाकुमारी विश्व विद्यालयाच्या वतीने दहावी व बारावीच्या परीक्षेत विशेष श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. उच्च ध्येय डोळ्यासमोर ठेऊन जीवनाचा शिल्पकार बनण्याचा प्रयत्न करा असे आवाहन प्रजापिता ब्रम्हाकुमारी विश्व विद्यालयाच्या प्रमुख राजयोगिनी सरला दीदी यांनी यावेळी बोलतांना केले.

 यावेळी झालेल्या सत्कार समारंभ कार्यक्रम प्रसंगी राजयोगिनी सरलादीदि कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या तर राजयोगिनी वंदना दीदी,वंदनीय अँड.लता दीदी, वंदनीय विद्या दीदी, समृद्धी दीदी, डॉ.निर्मलाताई सांगळे, डॉ.वैशाली चावरे, नेवासा प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष सुधीर चव्हाण,भाजपच्या महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा श्रीमती भारतीताई बेद्रे यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

यावेळी वंदना दीदी यांनी आलेल्या अतिथींचे स्वागत करून प्रास्ताविक केले.गुणवंत विद्यार्थ्यांना आशिर्वादरुपी प्रेरणा मिळावी त्यांच्या कार्य कर्तृत्वावर शाबासकीची थाप मिळावी म्हणून सत्कार समारंभ सोहळयाचे आयोजन प्रजापिता ब्रम्हाकुमारी विश्व विद्यालय नेवासा यांच्या वतीने करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलतांना सरलादीदी म्हणाल्या की प्रत्येकाने उच्च शिक्षण घेतांना उंच भरारी घेण्यासाठीच मनाशी खूणगाठ बांधावी व आपले ध्येय साध्य करण्यासाठी अध्ययनवर अधिक भर देऊन प्रयत्न करावा,विश्व विद्यालयाच्या वतीने झालेला हा आपला सन्मान आपल्याला शिवबाबांच्या रूपाने निश्चित ध्येय गाठण्यासाठी स्फूर्ती देत राहील अशा शुभेच्छा त्यांनी यावेळी बोलतांना दिल्या.

सत्कार

इयत्ता १० वी त पहिली आलेली सेंट मेरीज इंग्लिश स्कूलची विदयार्थीनी व नगरसेविका डॉ.निर्मला सांगळे
यांची कन्या कु.अर्पिता सांगळे म्हणाली की माझ्या यशात माझ्या आईची स्फूर्ती प्रेरणा व पाठबळ आहे,यात माझ्या शिक्षकांनी लक्ष देऊन वेळोवेळी मला मार्गदर्शन करत राहिले म्हणून मी हे यश संपादन करू शकले असे सांगून जीवनात अनेक संकटे येतात त्याने डगमगून न जाता संकटाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा असे आवाहन केले.

यावेळी डॉ.निर्मला सांगळे,पत्रकार सुधीर चव्हाण, अँड.लता दीदी यांनी मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तर विद्यार्थ्यांच्या वतीने प्राजक्ता सत्रे,गौरव नवले यांनी मनोगत व्यक्त केले सर्व विद्यार्थ्यांना प्रेरणादायी सुविचार पत्र व  गुलाबपुष्प भेट देऊन गौरविण्यात आले.वंदनीय प्रमिलादीदी क्षीरसागर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर राजयोगिनी वंदना दीदी यांनी उपस्थितांचे आभार मानले.उपस्थित विद्यार्थी व पालकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.

सत्कार
सत्कार

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

सत्कार
सत्कार

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

सत्कार
error: Content is protected !!