ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Accident

गणेशवाडी – पांढरीपुल येथे ट्रॅव्हलच्या धडकेत ४५ वर्षीय तरुण ठार झाल्याची घटना घडली आहे. पोलीस सुत्रांकडून समजलेल्या माहिती नुसार दि ११ एप्रिल रोजी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास अज्ञात चालकाने आपल्या ताब्यातील ट्रॅव्हल्स अहमदनगर ते संभाजीनगर हायवेवर असलेल्या पांढरीपुल येथे रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने चालवून पांढरीपुल येथील वांजोंळी शिवारातील एका हाॅटेल समोर उभा असलेला अज्ञात तरुण वय ४५ यास जोराची धडक देवुन त्यास जखमी केले.

अपघातग्रस्त तरुणास पुढील उपचार कामी अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डाॅक्टरांनी त्याला उपचारापुर्वी मयत घोषित केले. पोहेकाॅ. दत्ता गावडे यांनी सोनई पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालका विरुद्ध गुन्हा र. नं. १९३/२०२४ भा. द. वि. कलम ३०४(अ), २७९,३३७,३३८,मो वा का कलम १८४,१३४(अ) (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकाॅ. एम आर आडकित्ते हे करत आहेत.

धडक
धडक

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

धडक
धडक

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

धडक
error: Content is protected !!