ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

वाकचौरे

नेवासा – कोपरगाव तालुका महाविकास आघाडी व मा.खा.भाऊसाहेबजी वाकचौरे प्रतिष्ठानच्या वतीने नुकताच साईसृष्टी लॉन्स येथे नवनिर्वाचित खासदार, लोकनेते आदरणीय भाऊसाहेबजी वाकचौरे यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सह संपर्कप्रमुख राजाभाऊ झावरे तर प्रमुख उपस्थितीत कोपरगाव नगरीचे माजी नगराध्यक्ष संजय सातभाई उपस्थित होते.


सर्वप्रथम शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी सत्काराला उत्तर देताना खासदार वाकचौरे बोलत होते. मला विजयापर्यंत घेऊन जाण्यासाठी निष्ठावंत शिवसैनिकांसह ज्या ज्ञात-अज्ञात मतदारांचे सहकार्य मिळाले त्यांचा शतशः ऋणी असून परतफेड लोकहिताच्या कामाच्या माध्यमातून करणार असल्याचे जाहीर करताच उपस्थितांनी एकच टाळ्याचा कडकडाट करून दाद दिली. माझ्यासाठी अनेकांनी नवस केलेत, नारळाचे तोरण बांधलेत, अनेकांनी पैसे जमा करून दिलेत तर काहींनी देव पाण्यात ठेवले, अशा जनतेचा मी शतशः आभारी असून इतकं प्रेम मिळायला भाग्य लागते, अशी भावना व्यक्त करत मला पत्नी सरस्वती, मुलगा रोहित, सून पूजा आणि दोन्ही मुली व जावई यांनी सुद्धा प्रचारात आघाडी घेऊन मोलाची मदत झाल्याचे शेवटी नमूद केले.

वाकचौरे

यावेळी सर्वप्रथम सत्कार सोहळा समितीचे संयोजक मुकुंद सिनगर यांनी प्रास्ताविक करत उपस्थित सर्व पदाधिकारी, महिला भगिनी आणि हितचिंतक यांच्या उस्फुर्त उपस्थितीबद्दल स्वागत करून निवडणूक काळापासून ते निकालापर्यंत सर्वांनी झोकून देऊन केलेल्या प्रामाणिक कामामुळेच आपण विजयापर्यंत पोहचल्याने महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी यांच्यासह सर्व मतदार जनतेचे जाहीर आभार व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात राजाभाऊंनी मा. उद्धव साहेबांकडून आग्रहाने तिकीट मिळवून आणले होते याची आठवण देत विजयाचा गुलाल घेतल्याने समाधान व्यक्त केले आणि यापुढे सर्व शिवसैनिकांनी विधानसभेच्या तयारीला लागण्याच्या सूचना केल्यात. यावेळी माजी जिल्हाप्रमुख प्रमोद लबडे, संजय सातभाई, भरत मोरे, किरण खर्डे, कैलास गव्हाणे, महिला जिल्हाप्रमुख सपना मोरे, शहरप्रमुख सनी वाघ, कलविंदर दडीयाल, काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष नितिन शिंदे आदींनी आपले मनोगत व्यक्त करत खासदार साहेबांना शुभेच्छा दिल्यात.

वाकचौरे


यावेळी प्रमुख उपस्थितीत शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्रीरंग चांदगुडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आकाश नागरे, तालुका संपर्कप्रमुख प्रविण शिंदे, मनोज कपोते, विधानसभा संघटक असलम शेख, नगरसेविका वर्षा शिंगाडे, महिला आघाडीच्या राखी विसपुते, बेबीताई लांडगे, महिला बचत गटाच्या सौ.सुमन सप्रे, युवासेना तालुकाप्रमुख विजय गोर्डे, वाहतूक सेना जिल्हाप्रमुख इरफान शेख, ग्राहक संरक्षण कक्ष उपजिल्हा संघटक अशोक पवार, उपतालुकाप्रमुख संजय दंडवते, राजू शेख, रवि कथले, रंजन जाधव, पप्पू पडियार, राहुल देशपांडे, धर्मा जावळे, बाळासाहेब राऊत, मोहन होन, नंदू निकम, बाळासाहेब ढोमसे, तान्हाजी लामखडे, अमर कतारी, साहेबराव कंक्राळे, उत्तम जाधव, प्रमोद कुलट, शंकर सिनगर यांच्यासह बचत गटातील महिला, शाखाप्रमुख, गावप्रमुख, गावागावातील प्रमुख पदाधिकारी व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खऱ्या अर्थाने सत्कार सोहळा समितीचे संयोजक मुकुंद सिनगर, संजय दंडवते, इरफान शेख यांनी मिळून कार्यक्रम यशस्वी केला. सूत्रसंचालन शिवसेना संघटक अशोक कानडे यांनी तर मा.खा.भाऊसाहेबजी वाकचौरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष, युवा नेते रोहित वाकचौरे यांनी सर्वांचे आभार मानले.

newasa news online
वाकचौरे

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

वाकचौरे
वाकचौरे

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

वाकचौरे
error: Content is protected !!