ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

आरती

नेवासा – तालुक्यातील सलाबतपुर येथील रहिवासी असलेल्या कु. आरती रावसाहेब गायकवाड वय- वर्ष -14 इयत्ता- आठवी मध्ये शिकत असलेल्या मुलीचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना काल सलाबतपुर येथे घडली आरती गायकवाड हिच्या मृत्यूमुळे सलाबतपुर मध्ये शोककळा पसरली आहे.

आरती रावसाहेब गायकवाड हिच्या मागे दोन भाऊ, आई- वडील एक मोठी बहीण असा परिवार आहे.

याबद्दल सविस्तर माहिती अशी की काल अचानक आरती हिला ताप आला व जुलाब व उलट्या सुरू झाल्या त्यामुळे तिला नेवासा येथील खाजगी रुग्णालय मध्ये तिच्या आई-वडिलांनी दाखल केले परंतु दाखल करण्यापूर्वीच दवाखान्यांमध्ये पोहोचताच डॉक्टरांनी तिला मयत घोषित केले.

आरतीला सलग तीन दिवसापासून ताप येत होता परंतु तीने तो ताप अंगावरती काढला कुणालाही सांगितलं नाही व जास्त ताप आल्यानंतर ति चक्कर येऊन पडली त्यानंतर घरच्यांच्या लक्षात आले व तिला दवाखान्यामध्ये दाखल केली परंतु तोपर्यंत तिची प्राणज्योत मावळी होती.

आरती

तसेच दीड महिन्यापूर्वी वाकडी येथे बायोगॅसच्या विहिरीमध्ये मृत्युमुखी पडलेल्या कै.बाबासाहेब भगवंता गायकवाड यांची ती पुतणी होती तसेच गायकवाड परिवारावरती दीड महिन्याच्या अंतरामध्ये ही दुसरी दुःखद घटना घडल्यामुळे सलाबतपुर व सलाबतपुर परिसरामध्ये मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

तसेच सध्या वातावरणामध्ये उष्णतेचे प्रमाण वाढल्यामुळे नेवासा तालुक्यामध्ये 42 ते 43 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे त्याच अनुषंगाने आम्ही नेवासकर न्यूज नागरिकांना आवाहन करते की उन्हामध्ये जास्त फिरू नये तसेच जास्तीत जास्त पाणी प्यावे व आपल्या घरातील लहान मुलांनाची उष्णतेपासून काळजी घ्यावी व लहान मुलांनाही जास्तीत जास्त पाणी पाजावे तसेच बाहेर पडताना पांढऱ्या रंगाचे पंचा, कॅप, अदी वस्तूंचा उपयोग करावा जास्त प्रमाणात पांढरे वस्त्र परिधान करावे तसेच आपली कामे बारा वाजेच्या आत करावीत तसेच दुपारी बारा ते चार हा काळ घरामध्येच घालवावा असे आवाहन आम्ही नेवासकर न्यूज चॅनल करत आहे.

आरती
आरती

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

आरती
आरती

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

आरती
error: Content is protected !!