ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

शंकरराव

वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा.


सोनई – आ .शंकरराव गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त सोनई ता नेवासा येथे बुध दि 29 मे 2024 रोजी तालुक्यातील राजकीय, सामाजिक,धार्मिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांची मांदियाळी जमली होती सकाळी 8 ते दु 1 वाजेपर्यंत आ गडाख यांना हजारो कार्यकर्त्यांनी भेटून शुभेच्छा दिल्या. उपस्थित कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा आ गडाख यांनी स्वीकारल्या. याप्रसंगी महंत सुनीलगिरीजी महाराज ,महंत आवेराज महाराज यांनीही आ शंकरराव गडाख यांना शुभेच्छा दिल्या व आ गडाख हे सामाजिक, धार्मिक कार्यासाठी काम करणारे नेतृत्व आहे त्यांच्यावर असलेले कार्यकर्त्यांचे प्रेम आजच्या उपस्थित असलेल्या गर्दीवरून दिसून येत आहे.

शंकरराव


तालुक्यातील गावा,गावातील शेतमजूरापासून ते विविध संस्थाचे पदाधिकारी,तरुण,जेष्ठ, शिक्षक, वकील, पत्रकार ,वारकरी यांची याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थिती होती आ शंकरराव गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त घोडेगाव व नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयास रुग्णांना उपयुक्त व्हीलचेअर भेट देण्यात आले तसेच प्रवरासंगम येथे आ शंकरराव गडाख मित्रमंडळाच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये रक्तदात्यांनी रक्तदान केले,नेवासा येथील मित्रमंडळाच्या वतीने खडका फाटा येथे गोशाळेला चारा वाटप, तसेच स्नेहालय नगर येथे बिस्किटे वाटप करण्यात आले व माका पांढरीचा पुल येथे सर्वरोगनिदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते याचा अनेक रुग्णांनी लाभ घेतला.

शंकरराव
शंकरराव

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

शंकरराव
शंकरराव

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

शंकरराव
error: Content is protected !!