ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

घंटागाडी

नेवासा – मी नेवासकर सामाजिक संघटनेचे सामाजिक कार्यकर्ते शांताराम गायके यांनी नेवासा नगरपंचायतीच्या घंटागाडी समोर झोपत नगरपंचायतचा व प्रशासनाचा जाहीर निषेध केला यावेळी वेगवेगळ्या प्रभागातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. नेवासा शहरात घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी नेवासा नगरपंचायतचे अपयश झाकण्यासाठी अधिकार्यांचे उडवाउडवीची उत्तराना नागरिक मोठ्या प्रमाणात वैतागून शहरातील नागरिक आक्रमक झाले.शहरातील एकुण सतरा प्रभाग करीता घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी नेवासा नगरपंचायतकडे फक्त तीनच घंटागाडी उपलब्ध आहेत आणि अपुऱ्या कर्मचारी व मनुष्यबळामुळे शहरातील ठिक ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

तीन घंटागाडी वर शहरातील सर्व सतरा प्रभाग करीता घंटागाड्या चे नियोजन होत नसुन पाच सहा दिवसांनी एका एका वार्डात घंटागाडी उपलब्ध होत आहे.ज्या ठेकेदाराला तात्पुरता ठेका दिलाला आहे तो ठेकेदार नेवासा शहरातील घनकचरा व्यवस्थापन कडे ढुंकून सुध्दा पाहत नाही वेळेवर नंगरपतच्या अधिकाऱ्याला हाताशी धरून सर्व ठेक्याचे बिल काढून पोबारा करुन निघून जातो. ठेकेदार कडुन कोण कोण मलीदा खातो व कोणा कोणाला मलिदा घरी पोहच होतो.हे नेवासा शहरातील जनतेमध्ये चर्चेतील विषय बनला आहे.शहराला नियमित पिण्यासाठी पाणी नाही शहरात घनकचरा व्यवस्थापन नाही शहरात भटकंती जनावरांमुळे परिसरातील नागरिकांना बाजार पेठेत जिव मुठीत धरून जावे यावं लागते.

शहरातील स्ट्रीट लाईट पोलवरील लाईट बंद पडलेले आहेत अशा अनेक प्रश्नांनाने नेवासकर त्रस्त आहे जर संबंधित दोषी अधिकारी व ठेकेदारवर कायदेशीर कारवाई न झाल्यास या पुढील आंदोलन हे तीव्र स्वरूपाचे करणार असल्याचा इशारा शांताराम गायके यांनी दिला. या वेळी डॉ करण घुले, विकास चव्हाण, सतिष गायके,अनिल सोनवणे,किशोर गारुळे,अमृत फिरोदिया, संतोष चव्हाण, सय्यद , फारुख कुरैशी, प्रकाश चव्हाण,मनेष चव्हाण आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

newasa news online
घंटागाडी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

घंटागाडी
घंटागाडी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

घंटागाडी
error: Content is protected !!