ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

पाणी

नेवासा – नगरपंचायत असुन अडचण नसून खोळांबा नगरपंचायत पेक्षा ग्रामपंचायत बरी होती ग्रामपंचायत काळात एक दिवसा आड पाणी तर नगरपंचायत काळात दहा दिवसांनी पाणी पुरवठा होतो तोही कमी दाबाने कचरा संकलनाची तिच अवस्था. अशा नगरपंचायत च्या भोंगळ कारभाराच्या निषेधार्थ नेवासकर नागरिकांनी हंडा मोर्चा काढत मुख्याधिकारी दालनात ५ तास ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व समर्पण फाऊंडेशनचे प्रमुख डॉ करणंसिह घुले यांनी केले.

स्वच्छतेचा ठेका संपण्याच्या आदल्या दिवशी प्रस्ताव पाठविण्यात येतो आधी का नाही पाणीपट्टी ३६५ दिवसाची घेतली जाते मात्र पाणी शंभर दिवस ही नाही पाणीपट्टी भरली नाही तर २४ टक्के व्याजाची आकारणी केली जाते अधिकारी एसीत बसुन
रोज फिल्टरचे पाणी पितात मात्र नागरीकांना पिण्याचे पाणी नाही पाणी योजना जुनी झाली म्हणतात .पाणी पुरवठा वर्षातून निम्मे दिवस सुद्धा होत नसल्याने पाणीपट्टी वसुल केलेले नागरीकांचे पैसे परत करा अशी मागणी यावेळी नागरीकांनी केली.

अधिकारी फक्त टक्केवारी गोळा करण्यासाठी सुविधा पुरविण्यासाठी नाहीत का ? बांधकाम परवानगीसाठी पैशाची मागणी, उपनगरात टँकर सुरु केले तेही दिसत नाही. पाणी योजना बंद झाल्यास शहरात टॅकरने पाणी पुरवठा करणार का ? असा प्रश्नाचा भडीमार आंदोलकांनी उपस्थित परीक्षाविधीन मुख्याधिकारी ( वर्ग १) सोनाली म्हात्रे आरोग्य व पाणी पुरवठा विभाग प्रमुख योगेश सर्जे, प्रशासकीय अधिकारी निरीक्षक रामदास म्हस्के यांना केला.

प्रभारी मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांना राहुरी वरून सर्व प्रश्नांबाबत चर्चा करून महावितरणचा कारभार सुधारण्यासाठी वरिष्ठ स्तरावर बैठक आयोजित करून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. तसेच वीज पुरवठा सुरळीत असल्यास पूर्वीप्रमाणे शहराला एक दिवसाड पाणीपुरवठा करण्याचे लेखी आश्वासन दिले. ज्या ठिकाणी तांत्रिक कारणामुळे पाणी देण्यास चार दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागेल त्या प्रभागांमध्ये टँकरद्वारे पिण्याच्या शुद्ध पाण्याचा पुरवठा नागरिकांना केला जाईल असे लेखी आश्वासन दिले. त्याचबरोबर नवीन पाणी योजनेसाठी मंत्रालय स्तरावर स्वतः प्रयत्न करण्याचे आश्वासन दिल्यानंतर धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले.

या आंदोलनात समर्पण फाऊंडेशन चे अध्यक्ष करण घुले, माजी सरपंच सतीश गायके, आम आदमी चे शहराध्यक्ष संदीप आलवणे, भाजपाचे मनोज पारखे, मी नेवासकर चे शांताराम गायके, विकास चव्हाण शिवसेनेचे भाऊसाहेब वाघ, बंडु शिंदे, अनंत डहाळे मनसेचे रविंद्र पिंपळे यांच्यासह महिला, पुरुष नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

newasa news online
पाणी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

पाणी
पाणी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

पाणी
error: Content is protected !!