ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

आरोग्य

नेवासा – राज्य शासनाच्या २०२१ च्या परिपत्रकानुसार सर्व खाजगी व शासकीय दवाखान्यात देण्यात येणाऱ्या सेवांचे दरपत्रक ,रुग्ण हक्क सनद लावण्याची मागणी नगर जिल्हा आरोग्य समिती केली होती .वेळोवेळी पाठपुरावा केल्यानंतर अखेर दिनांक ३१ रोजी नेवासा येथे यास प्रारंभ झाला आहे.

राज्य आरोग्य सेवा आयुक्तालय यांच्या नोव्हेंबर २०२१ च्या आदेशानुसार प्रत्येक खाजगी व सरकारी दवाखान्यात रुग्ण हक्क सनद व रुग्णांचे हक्क व जबाबदाऱ्या , दवाखान्यात दिल्या जाणाऱ्या १५ सेवांचे दरपत्रक , तक्रार निवारण कक्ष संपर्क क्रमांक आदि माहितीचे फलक दर्शनी भागात ठळकपणे दिसतील असे लावण्याची मागणी नगर जिल्हा आरोग्य समितीचे समन्वयक कारभारी गरड यांनी केली होती. तसेच माहितीच्या अधिकारात तालुक्यातील अशी माहिती लावलेल्या दवाखान्यांचे फोटो पुराव्यासह मागणी केली होती. परंतु त्यास प्रतिसाद न मिळाल्याने अशा दवाखान्यांवर कारवार्ईची मागणी केली होती. त्यावर ग्रामिण रुग्णालयाचे अधिक्षक डाॕ. मोसिन बागवान यांनी कारवाईचे संकेत दिल्यावर असे फलक लावण्यास प्रारंभ झाला आहे.

नेवासा येथील डॉक्टर करणसिंह घुले यांच्या लक्ष्मी हॉस्पिटलमध्ये दरपत्रक व रुग्ण हक्क सनद अधिक्षक डाॕ. मोसिन बागवान , जिल्हा आरोग्य समितीचे कारभारी गरड , डाॕ.करणसिंह घुले , एसएमबीटी चे जनसंंपर्क आधिकारी अमोल पिंगळे , मेडिकव्हरचे सागर अढागळे यांचे उपस्थितित दि.३१ रोजी वरीलप्रमाणे रुग्ण जागृतीचे फलक लावण्यात आले. नेवासा येथे इतर दवाखान्यात ही फलक लावण्यात येत आहेत.

newasa news online
आरोग्य

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

आरोग्य
आरोग्य

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

आरोग्य
error: Content is protected !!