ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

मृत्यू
मृत्यू

नेवासा – विहीरीत पडलेले मांजर वाचविण्यासाठी गेलेल्या पाच जणांचा विहीरीत बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. ९) दुपारच्या सुमारास वाकडी ( ता. नेवासा, जि. अहमदनगर ) येथे घडली. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले. मयतांची नावे अद्याप समजू शकलेली नाही. 

शेतातील विहिरीत पडलेले मांजर काढण्यासाठी सुरुवातीला एक जण गेला. त्याला विहरीतून वर येता येत नव्हते. म्हणून दुसरा उतरला. तोही बुडाला. त्यानंतर इतर तिघेजण अशाचपध्तीने विहीरीत उतरले होते. या विहीरीत स्लरी बनविण्यासाठी गोमुत्र, शेण, डाळीचे पीठ टाकण्यात आलेले होते. त्यामुळे पाण्यात गॅस तयार झाला असण्याची शक्यता आहे. हा गॅस नाका तोंडात जाऊन पाच जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

यासंदर्भात वाकडी गावातील अंकुश काळे म्हणाले, की विहीरीत पडलेले मांजर काढण्यासाठी सुरुवातीला एकजण गेला होता. तो बुडाल्याने त्याला वाचविण्यासाठी दुसरा उतरला. त्यानंतर इतर तिघे उतरले. त्यांना बुडून मृत्यू झाला असून, विहीरीत गोमुत्र, शेण, यामुळे गॅस तयार झालेला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे मृतदेह काढण्यासाठी गावकऱ्यांनी मदत कार्य हाती घेतले असल्याचे सांगितले.

शोष खड्डे मध्ये पडलेल्या पाच जणांना वाचवण्यामध्ये प्रशासनाचे अपयश पहावयास मिळत आहे चार ते पाच घंटे उलटून गेल्यानंतर अद्यापही एकही व्यक्ती बाहेर प्रशासन न काढल्यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाच्या विरोधामध्ये वाकडी या ठिकाणी रोष व्यक्त केला जात आहे.

नेवासा तालुका प्रशासनाकडे आपत्कालीन व्यवस्था उपलब्ध नसल्याने तीन तासाहून अधिक काळ बुडालेल्या पाच जणांचा शोध घेण्यास प्रशासनास अपयश…… रात्री नऊ वाजेपर्यंत ग्रामस्थांची घटनास्थळी मोठी गर्दी झाली असून झालेली गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांची नाकीनव येत आहे…

नागरिकांच्या वतीने शोष खड्ड्यामधील गॅस जाळण्याचा प्रयत्न केला गेला परंतु तो अपयशी ठरला नागरिकांचे अतोनात प्रयत्न मृतदेह बाहेर काढण्यासाठी चालू आहेत परंतु प्रशासनाची साथ नसल्यामुळे नागरिक ही हातबल झाले आहेत.

newasa news online
मृत्यू

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

मृत्यू
मृत्यू

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

मृत्यू
Share the Post:
error: Content is protected !!