ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

मारहाण

नेवासा – नेवासा बु. येथील राजवाड्यातील अंगणवाडीत दि-02/07/2024/ रोजी सकाळी 10.15 वा सुमारास मी तसेच अंगणवाडी मदतनीस असे अंगणवाडी येथे असतांना अंगणवाडीच्या आतमध्ये सचिन रतन धोंगडे रा.नेवासा बु. हा आला व मला अंगणवाडीच्या वॉल कंपाउंडच्या चाव्या मागु लागला त्यावेळी मी त्यांना समजावुन सांगत होते कि ही जागा शासनाची असुन त्या जागेच्या वॉल कंपाउंडच्या चाव्या मी तुम्हाला देवु शकत नाही.त्याचा त्याला राग आल्याने त्याने माझ्या अंगावर धावुन येवुन माझा हातधरुन लज्ज्ञ्जा उत्पन्न होईल असे वर्तन करुन माझ्या हातातुन चाव्या हिसकावुन घेवून माझ्या अंगावर फेकुन मारल्या..

गुन्हा

व मला म्हणाला कि मला या ठिकाणी आंबेडकरांचा पुतळा उभारुन त्या बाजुला बगीचा तयार करायचा आहे.तुला या जागेमध्ये नांदायचे आहे का याच ठिकाणी झोपायचे आहे.तु काय मला आडवी येवु नको.मी तुझ्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करीन अशी धमकी दिली.त्यांनतर त्याने मला धमकी दिली कि तु जर चाव्या या ठिकाणी ठेवुन गेली नाही तर तुला या ठिकाणी पुन्हा येवु देणार नाही.तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिल्याने सचिन रतन धोंगडे रा.नेवासा बु.ता.नेवासा याच्या विरोधात नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा
newasa news online
गुन्हा

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

गुन्हा
गुन्हा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

गुन्हा
error: Content is protected !!