ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

बसस्थानक

गणेशवाडी –तब्बल ६९ लाख रुपये खर्चून सोनई बसस्थानकाचे सुशोभिकरण सुरु आहे. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी खर्चून प्रवाशांना कोणत्या सुविधा मिळणार, हे मात्र कोडेच आहे. फक्त कागद रंगविण्यासाठीच हे काम सुरु असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

सध्या बसस्थानकाच्या आवारातील काँक्रीटीकरण सुरु आहे. ते कामही फक्त पाच लाखात पूर्ण होणारे आहे. त्यापूर्वी प्रवाशांना बसण्यासाठीच्या ओट्याची डागडूजी करण्यात आली. त्या कामालाही किरकोळ खर्च आला. मग फक्त डागडूजीसाठी तब्बल ६९ लाखांचा खर्च नेमका कसा होणार, हा प्रश्न आहे. याबाबत काम करणाऱ्या ठेकेदाराला विचारले असता त्यानेही उडवाउडवीची उत्तरे दिली. या कामाकडे पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी भेट दिलेलीही ऐकिवात नाही. मग हे काम फक्त शासनाच्या निधीचा चुराडा करण्यासाठीच सुरु असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

बसस्थानक

शनिशिंगणापूर-शिर्डी या महामार्गावरील सोनई हे महत्त्वाचे बसस्थानक आहे. मात्र येथे कायमस्वरुपी कर्मचारी नाही, हे वास्तव आहे. असला तरी तो हजर नसल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून वारंवार होतात. बसच्या फेऱ्याही अनियमित असतात. एसटी महामंडळाने अगोदर मुलभूत सुविधा द्याव्यात, मगच निधीची उधळपट्टी करावी, अशी तक्रार सोनईकरांनी केली आहे.


मुलभूत सुविधा मिळेनात

सध्या सुशोभिकरणारच्या कामाच्या नावाखाली पैशाची फक्त उधळपट्टी सुरु आहे. या निधीतून प्रवाशांना पिण्याचे पाणी, बसस्थानकात विद्युत सुविधा, उन्हापासून संरक्षणासाठी शेड, अशा कोणत्याच सुविधा होणार नाहीत. फक्त पत्रे बदलणे, काँक्रीट करणे एवढेच काम होणार असल्याचे समजते. मग एवढ्याशा कामाला ६९ लाख रुपये कशासाठी हा सवाल आहे.


बसच्या फेऱ्याही अपुऱ्या

शनिशिंगणापूर हे जगप्रसिद्ध मंदीर सोनईपासून जवळ असले तरी, येथील बसस्थानकात कायमस्वरुपी कर्मचारी नाही. एसटीच्या फेऱ्याही अपूऱ्या आहेत. हे बसस्थानक फक्त शोभेची वस्तूच बनले आहे. मुलभूत सुविधा न देता व कर्मचाऱ्याची कायमस्वरुपी नियुक्ती न करता सध्या खर्च होणाऱ्या निधीचा नेमका उपयोग काय, हा प्रश्न ग्रामस्थ विचार आहेत.


सोनई बसस्थानक सुशोभिकरणाचे काम गेल्या आठवड्यापासून सुरु आहे. मात्र प्रस्तावित आराखडा कचऱ्यात टाकून काँक्रीटीकरण सुरु आहे. नित्कृष्ठ खडी, कमी सिमेंट अशा पद्धतीने फक्त ठिगळे जोडण्याचे काम सुरु आहे. या कामाचे ऑडीट होऊन, अधिकाऱ्यांनी येथे भेट द्यावी, अशी प्रवाशांची मागणी आहे. पाच-दहा लाखांच्या कामासाठी ६९ लाख कशाशाठी, हे अनुत्तरीत आहे

बसस्थानक
बसस्थानक

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

बसस्थानक
बसस्थानक

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

बसस्थानक
error: Content is protected !!