ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

चोरी

नेवासा – वीज गेल्याने अंधाराचा फायदा घेत वेटरने हॉटेलच्या गल्ल्यामध्ये ठेवलेले २ लाख ४८ हजार रुपये चोरून नेल्याची घटना माळीचिंचोरा शिवारात घडली. याबाबत हॉटेल मालकाच्या फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत हॉटेल मालक दिलीप शेषराव वाघ (वय ५२) रा. माळीचिंचोरा शिवार यांनी नेवासा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ८ जुलै रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास कृष्णा ताराचंद हिवाळे रा. वाळूज पंढरपूर, ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर याने लाईट गेल्याचा व अंधाराचा फायदा घेऊन माझे धनश्री हॉटेलचे गल्ल्यामध्ये ठेवलेले २ लाख ४८ हजार रुपये चोरून नेले आहेत.

चोरी

१५ दिवसांपूर्वी माझ्या हॉटेलवर कामाला ठेवलेला वेटर कृष्णा ताराचंद हिवाळे, रा. वाळूज पंढरपूर, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर हा मला चोरीनंतर दिसला नाही. हॉटेलच्या परिसरात शोध घेतला. परंतु तो मला हॉटेलच्या परीसरात दिसून आला.नाही म्हणून मी माझ्या हॉटेलवर असलेले सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता, त्यामध्ये ८ जुलैरोजीच्या रात्री ०१ वाजण्याच्या सुमारास वेटर कृष्णा ताराचंद हिवाळे हा माझ्या हॉटेलच्या गल्ल्यासमोर टेहाळणी, निगराणी करताना दिसला. पहाटे ५ वाजता माळीचिंचोरा शिवारामध्ये लाईट जाते त्या गोष्टीचा तसेच त्याने हॉटेलचे इनव्हर्टरचे बटन बंद करून लाईट गेल्याचा व अंधाराचा फायदा घेऊन गल्ल्यातून पैसे घेऊन पळून गेला. या फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

newasa news online
चोरी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

चोरी
चोरी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

चोरी
error: Content is protected !!