ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

हज

कुकाणा :- अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील कुकाणा येथील मूजावर परीवारातील ग्रामपंचायत सदस्या सौ.हकिमाबी शेख व लालाभाई शेख तसेच एडीसीसी बॅंकेचे लालखाॅ पठाणसाहेब व त्यांच्या पत्नी हसिना पठाण हे दोन्हीही दाम्पत्य पवित्र हज यात्रेसाठी जात आहेत त्या निमित्ताने अब्दुल हाफिज शेख फ्रेंड्स सर्कल व मूजावर फॅमिली च्या वतीने दावत-ए-हज व या पवित्र यात्रेसाठी जाणाऱ्या दांपत्यांला शुभेच्छा प्रदान समारंभाचे नुकतेच आयोजन कुकाणा येथील अब्दुल हाफिज शेख यांच्या निवासस्थानी करण्यात आले होते .
‘हज यात्रेकरूंनी संपूर्ण जगाच्या शांती आणि समृद्धीसाठी त्याचबरोबर मानवाला सर्व प्रकारच्या संकटांपासून सुरक्षित ठेवण्‍यासाठी प्रार्थना करावी’ असे आवाहन माजी आमदार हभप पांडुरंग अभंग यांनी करत दोन्ही दांपत्यांचा प्रवास आनंदी होवो व त्यांची यात्रा सफल होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करत यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या.


याप्रसंगी अहले-सुन्नत-वल-जमात- जामा मशिद कुकाणाचे मौलाना शमशाद पठाण यांनी म्हटले की,हज ही एक पवित्र तीर्थयात्रा आहे जी प्रत्येक मुस्लिमांना त्यांच्या आयुष्यात एकदा तरी करणे आवश्यक असते–ती इस्लामच्या पाच स्तंभांपैकी एक आहे. हाजी बनल्यावर आचरणाचे नियम ही सक्षमतेने पाळावे लागतात.दरवर्षी,जगभरातील नशिबवान मुस्लिम बांधवांना मक्का- मदिना सारख्या पवित्र व धार्मिक दृष्टीने महत्त्वाच्या -आधुनिक सौदी अरेबियाच्या विविध शहरात हजच्या निमित्ताने प्रवास करण्याची संधी मिळते.दोन्ही दांपत्यांचा प्रवास सुखकर व सफल होवो अशा यावेळी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी मर्कज मशिदीचे मौलाना इम्रान शेख,अविभाऊ बानकर,अमोल अभंग, पप्पूशेठ जावळे,सुनिल गर्जे आदिंनीही दोन्हीही दाम्पत्यांना पवित्र हज यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या.

हज


सदर शुभेच्छा प्रदान कार्यक्रमासाठी मा.आ.हभप पांडुरंग अभंग,कुकाणा ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच लताताई अभंग, ज्ञानेश्वर चे संचालक नारायण म्हस्के, शैनेश्वर देवस्थान चे अविनाभाऊ बानकर,शिवा भाऊ पाठक, नगराध्यक्ष नंदू पाटील, राजू पाटील उंदरे,योगेश म्हस्के,शिंगवे तुकाईचे सरपंच सतिष थोरात,विजूभाऊ देशमुख,जमीर पटेल,अमर शेख,अल्लूभाई ईनामदार,निलेश गोडसे,एकनाथ कावरे,सावता परीषदेचे पप्पूशेठ जावळे,अमोल अभंग,बंडूशेठ देशमुख,रज्जाक ईनामदार, इकबाल ईनामदार,मुसाभाई ईनामदार,सलिम ईनामदार,कुलदिप देशमुख,पत्रकार रविंद्र सुर्यवंशी, अनिल गर्जे,जाणता राजाचे सुनिल गर्जे,बाबासाहेब गोल्हार,श्रीधर कासार,जुनेद शेख,शुभम गर्जे,पोपट सरोदे,डाॅ.आर्ले,राजू राऊत,

बाबुलाल शेख,आरिफ तांबोळी,इन्नूस नालबंद,अकिल तांबोळी,राजू शेख,वसिम तांबोळी,मुन्नाभाई शेख,फैयाज तांबोळी,मनोज हूलजूते,सिद्धार्थ कावरे,मुन्नाभाई ईनामदार,मतिन ईनामदार,तनविर शहा,शिवाजी कावरे,सचिन बडे,अमोल हांडे,विशाल निकम,सोमनाथ कचरे,रामेश्वर पवार,इन्नूस शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
सौ.व श्री.लालाभाई शेख पुणे येथील युवा व्यावसायिक,युवक राष्ट्रवादी काँग्रेस चे अब्दुल हाफिज शेख यांचे आईवडील आहेत व सौ.व श्री.लालखाॅ पठाण हे कुकाणा येथील प्रसिद्ध डाॅक्टर सुजाअत पठाण यांचे आईवडील आहेत.
सदर कार्यक्रमाचे संचालन प्रा.शकुर शेख यांनी केले तर सर्व उपस्थितांचे आभार अब्दुल हाफिज शेख यांनी मानले.

newasa news online
हज

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

हज
हज

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

हज
error: Content is protected !!