ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

वार

उसनवारीच्या पैशातून कोयत्याने वार केल्याने एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना नगर तालुक्यातील बहिरवाडी शिवारात शुक्रवार (दि. १९) रोजी घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बहिरवाडी येथील अशोक श्रीमंत दारकुंडे (वय ४९), हे गावातीलच हळदीचा कार्यक्रम आटोपून घरी जात असताना वाकी वस्ती ते काटवन, जाणाऱ्या रस्त्यावर गणपत वाघ यांच्या शेताजवळ विकास अंकुश काळे (रा. बहिरवाडी ता. नगर) व त्याच्यासोबत असलेल्या अनोळखी इसम यांनी उसनवारीच्या पैशांवरून अशोक दारकुंडे यांच्याशी वाद घातला.

या वेळी आरोपींनी दारकुंडे यांच्या मानेवर कोयत्याने गंभीर वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. यात अशोक दारकुंडे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.अशोक दारकुंडे यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून विकास अंकुश काळे (बहिरवाडी) व अनोळखी इसम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास एमआयडीसी पोलिसांकडून सुरू असून, कोयत्याने वार केल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

वार

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

वार
वार

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

वार
Share the Post:
error: Content is protected !!