ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

सुधीर चव्हाण

नेवासा – नेवासा प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष पत्रकार सुधीर चव्हाण यांना गोंडेगाव येथील जनकल्याण फाउंडेशन आयोजित राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांच्या नावाने दिला जाणारा जिल्हास्तरीय आदर्श पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे.जनकल्याण फाउंडेशनचे अध्यक्ष पांडुरंग रोडगे व सचिव सुरेश रोडगे यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले आहे.

सुधीर चव्हाण

नेवासा तालुक्यातील गोंडेगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात दि.३० एप्रिल रोजी होणाऱ्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात सदरचा पुरस्कार पत्रकार सुधीर चव्हाण यांना प्रदान करण्यात येणार आहे. सामाजिक व धार्मिक क्षेत्रात संत विचार प्रचार प्रसार प्रबोधन तसेच सामाजिक क्षेत्रात देत असलेल्या योगदानाबद्दल सदरचा आदर्श पत्रकारिता पुरस्कार दरवर्षी दिला जातो या वर्षीच्या पुरस्कारासाठी पत्रकार सुधीर चव्हाण यांची निवड झाली. आदर्श पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पत्रकार सुधीर चव्हाण यांचे विविध स्तरावर अभिनंदन होत आहे.

newasa news online
सुधीर चव्हाण

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

सुधीर चव्हाण
सुधीर चव्हाण

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

सुधीर चव्हाण